नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्हा शासकीय रुग्णालयास (District Government Hospital) औषधांचा पुरवठा करणाऱ्या मेडिकल डिस्ट्रिब्युटरच्याविरोधात माहिती अधिकाराचे (RTI) अर्ज टाकून दोघा बाप-लेक आरटीआय पिता-पुत्रांनी (Father and Son) पन्नास हजारांची खंडणी उकळली आहे. याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, काही स्थानिक वृत्तपत्रे व चॅनेलवर या औषध खरेदीतील गैरव्यवहार प्रसिद्ध न करण्यासाठी थेट १५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचे तक्रारदाराने फिर्यादीत नमूद केले आहे.
पुखराज माणिकचंद जैन व निलराज पुखराज जैन अशी संशयित पितापुत्रांची नावे आहेत. याबाबत मेडिकल डिस्ट्रिब्युटर (Medical Distributor) कपील रमेश अरोरा (वय ४६, रा. सिद्धमुनी, गणेणबाबानगर, पुणे रोड) यांनी यासंदर्भान फिर्याद नोंदविली आहे. त्यान्वये, ‘गेट वेल डिस्ट्रीब्युटर’ या नावाने सन २००९ पासून ते मेडिकलमधील औषधे व साहित्य होलसेल दरात भारतात विक्री व्यवसाय करतात. त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयास काही वर्षांपासून ‘जेम’ व महाटेंडर या शासकीय वेबसाईटवर पूर्तता करुन औषध पुरवठा केला आहे.
त्याचवेळी त्यांच्या ओळखीतील माहिती अधिकार कार्यकर्ते पुखराज जैन व त्यांचा मुलगा निलराज हे जानेवारी २०२५ मध्ये पुणे रोडवरील सुविचार हॉस्पिटलजवळ भेटले. तेव्हा पुखराज याने अरोरा यांना ‘तुमच्या फर्मची माहिती आरटीआयखाली मागविणार आहे’ असे म्हणूण चॅनेल व पेपरला (News Paper) बातमी देऊन तुमची व फर्मची बदनामी करु असा दम भरला. परंतु बदनामी नको म्हणून अरोरा यांनी जैनला पन्नास हजार रुपये दिले. याबाबत सहायक निरीक्षक सतीश शिरसाठ तपास करत आहेत.
बातम्या थांबवण्यासाठी मागणी
संशयित पिता-पुत्रांनी या प्रकरणात काही व्यक्तिंना हाताशी धरुन औषध व साहित्य खरेदीतील गैरव्यवहार व त्यासंबंधी विविध माध्यमांतून स्टोरीज व बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्याचवेळी संशयित ९ जून रोजी अरोरा यांच्या कार्यालयात गेले आणि बातम्या थांबवायच्या असतील तर, १५ लाख रुपये खंडणी द्या अशी मागणी केली. त्यामुळे अरोरा यांनी पंचवीस हजार रुपये देण्यास समर्थता दर्शविली. मात्र, संशयितांनी नकार देत ‘किमान पाच लाख रुपये द्या, तरच मिटेल’ असे म्हणूण बदनामी सुरुच राहिल, अशी धमकी दिली.
तीन दिवसांत खंडणीचे चार गुन्हे
शहरात विविध प्रकरणे व प्रसंगात संशयितांनी बदनामी करण्याचे शस्त्र पुढे करून तक्रारदारांकडे खंडणीची मागणी व वसूल केली आहे. यात काही खासगी व्यक्ती, लोकल युट्यूबर, काही माध्यमांतील निवेदक, आरटीआय कार्यकर्ते व परस्परविरोधी खासगी कंत्राटदारांचा सहभाग समोर आला आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही सुरु आहे.
मुद्दे
* घटनाक्रम अरोरा यांच्या कार्यालयातील सीसीटीव्हीत कैद
* ऑडिओ व व्हिडीओ, मोबाईलमधील संभाषण उपलब्ध
* मिळालेल्या टेंडरबाबत बातम्या देऊन बदनामी
* जाच वाढत असल्याने तक्रार दाखल
* जैन खासगी ठेके दार असल्याचा दावा
* टेंडर मिळविण्यासाठी हा वाद सुरु असल्याची रुग्णालयात चर्चा




