Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik Crime : पंचवटी गोळीबार प्रकरणी माजी नगरसेवकाची कोठडी वाढवली

Nashik Crime : पंचवटी गोळीबार प्रकरणी माजी नगरसेवकाची कोठडी वाढवली

कारागृहातून निकमचा ताबा घेणार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पंचवटीत (Panchvati) दोन टोळ्यांच्या पूर्ववैमनस्यातून एकावर गोळी झाडल्याच्या कटात सहभागी असल्याच्या संशयावरून अटकेत असलेले भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील (Jagdish Patil) यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गंभीर गुन्ह्यात कारागृहात बंदिवान असलेल्या शेखर निकम याला गोळीबाराच्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यासह मुख्य संशयितांनाही अटक करणे प्रलंबित असून, पाटील यांच्याकडून अधिक माहिती संकलित करण्यासाठी ही कोठडी वाढवण्यात आली आहे.

- Advertisement -

सन २०१७ मध्ये पेठ रस्त्यावर सराईत गुन्हेगार (Criminal) संतोष उघडे टोळीने किरण निकम या गुन्हेगाराची निघृण हत्या (Murder) केली होती. तेव्हापासून दोन्ही टोळ्यांमध्ये वैमनस्य असल्याने निकम हत्येप्रकरणी निर्दोष सुटलेला सागर जाधव याच्यावर निकम टोळीतील १५ जणांनी १७ सप्टेंबरच्या पहाटे गोळी झाडली. हल्ल्यात सागरच्या मानेत गोळी अडकल्याने तो गंभीर जखमी झाला होता.

YouTube video player

दरम्यान, पंचवटी पोलिसांत (Panchvati Police) याबाबत दाखल गुन्ह्यात होऊन आतापर्यंत १५ पैकी १३ संशयितांना अटक झाली असून, त्यांच्या जबाबासह कॉल डिटेल्सनुसार भाजपचे (BJP) माजी नगरसेवक जगदीश पाटील हे स्वतः संशयितांनी रचलेल्या कटात सहभागी असल्याचे उघड झाले. त्यानुसार पाटीलला अटक झाली. पाटील यांना २१ सप्टेंबर रोजी अटक झाल्यावर २२ सप्टेंबर रोजी न्यायालयाने २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी (Police Custoy) सुनावली होती. त्यानंतर पुन्हा दोन दिवस कोठडीत वाढ झाली आहे. तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार करीत आहेत.

विकी पसारच…

गुन्ह्यातील कैद्याची न्यायालयात भेट घेणे, संशयितांना शस्त्रे पुरवणे, पैसे पुरवणे, संशयितांसोबत बैठका घेणे यासंदर्भातील तपास सुरू आहे. दरम्यान, सागर जाधव हा किरण निकमच्या हत्येतून सन २०२३ पासून निर्दोष मुक्त आहे, तर किरणचा भाऊ शेखर निकम हा विविध गुन्ह्यांत सध्या नाशिकरोड कारागृहात आहे. १० सप्टेंबर रोजी एका गुन्ह्याच्या सुनावणीकरता शेखरला जिल्हा न्यायालयात आणले होते. तेव्हा गोळीबारातील संशयित विकी वाघ व इतर साथीदार तेथे पोहोचले. त्यावेळी जगदीश पाटीलही तेथे होते. त्यावेळी संशयितांनी सागरवर गोळी झाडण्याचा कट रचल्याचे समजते. त्यानंतर नाशिकरोडमधील एका हॉटेलातही शेखर निकम, जगदीश पाटील व विकी वाघसह इतरांची बैठक झाली होती.

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाच्या धडकेत दाम्पत्याचा मृत्यू

0
सटाणा | प्रतिनिधी Satana साक्री-शिर्डी रस्त्यावर ढोलबारे गावाजवळ मोटरसायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार झाले. संदीप गावित(३५) व आशाबाई संदीप गावित(३२) रा. अमली...