नाशिक | Nashik
शहरातील वाढत्या गुन्हेगारीला (Criminal) आळा घालण्यासाठी नाशिक पोलिसांनी आण्णा, भाई, भाऊ, बॉस यांच्या विरोधात चांगलीच मोहीम सुरु केली आहे. त्यामुळे गुंडाचे धाबे चांगलेच दणाणले असून, त्यांनी आश्रयासाठी इतर ठिकाणी पलायन केले आहे. अशातच आता धमकीच्या आशयाचे रॅप साँग आणि रील्स पोस्ट करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह चौघांवर गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ‘आमचंच साम्राज्य आहे, कोणी लागत नाही नादी’, अशा धमकीच्या आशयाचे रॅप साँग आणि रील्स पोस्ट करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी नगरसेवक व सराईत पवन पवार यांच्यासह चौघांविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे पवार याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
दरम्यान, पोलीस नाईक योगेश रानडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पवन पवार (Pavan Pawar) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप कुऱ्हाडे करीत आहेत.





