राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 5800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची (Onion) राहाता बाजार समिती 2712 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर एकला 4400 ते 5800 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 2800 ते 4350 रूपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 1200 ते 2750 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 1500 ते 4000 रुपये. जोड कांदा (Onion) 700 ते 1800 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.
डाळिंबाची (Pomegranate) 10640 कॅरेट आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 161 ते 255 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 101 ते 160 रुपये. डाळिंब नंबर 3 ला 51 ते 100 रुपये. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 50 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.




