Sunday, September 13, 2026
Homeब्रेकिंग न्यूजडंपरची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा मृत्यू

डंपरची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा मृत्यू

येवला । प्रतिनिधी Yeola

- Advertisement -

भरधाव डंपरने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कोपरगाव येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. आसिफ मोहम्मद शेख (वय ३२) आणि सईफ रफिक शेख (वय १७), रा. कोपरगाव (जि. अहिल्यानगर), अशी मृतांची नावे आहेत.

दोघेही मोटारसायकल (क्रमांक १७ बीडब्ल्यू ५८६४) वरून प्रवास करीत असताना येवला – कोपरगाव महामार्गावर बजरंग हॉटेल समोर त्यांच्या मोटारसायकलला डंपरने (क्रमांक एमएच १२ एलटी ९९८०) जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही मोटारसायकलस्वार डंपरच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर अपघात रविवारी, सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडला.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले असून डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 5800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची (Onion) राहाता बाजार...