नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राईस मिल टाकण्यासाठी लहान भावाने (Younger Brother) सख्ख्या माेठ्या भावाच्या (Big Brother) नावे बनावट सही व कागदपत्रांच्या आधारे परस्पर पन्नास लाख रुपयांचे कर्ज (Loan) मंजूर करुन घेत फसवणूक केली आहे. कृषि कर्जाच्या आधारे हे पैसे लाटण्यासाठी लहान भावाने एका राष्ट्रीयकृत बँकेत मोठया भावास सहकर्जदारही केले. मात्र, बँकेला लिंक असलेल्या माेबाईल नंबरमुळे भावाला लहान भावाच्या करामती निदर्शनास आल्यावर त्याने सरकारवाडा पाेलीस ठाणे (Sarkarwada Police Station) गाठून फिर्याद नाेंदविली आहे. त्यानुसार बनावटीकरण व फसवणुकीचा (Fraud) गुन्हा दाखल झाला आहे.
फैय्याज अब्दूल कादीर शेख(वय ४४, रा. ठाणापाडा, ता. त्र्यंबकेश्वर, नाशिक) असे संशयित भावाचे नाव आहे. याबाबत, इम्तियाज अब्दूल कादीर शेख(वय ५४, रा. सीडर हाईट्स, सात्विकनगर, नाशिक) यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, त्यांचा ठाणापाडा येथील मूळ पत्यावर सिल्व्हर ट्रेडर्स नावाने किराणा दुकान व बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्सचा व्यवसाय त्यांचा मुलगा शहेबाज न्यू सिल्व्हर ट्रेडर्स नावाने खते, बि-वियाणे व औषधे विक्रीचा व्यवसाय करताे. दरम्यान, इम्तियाज याचे पित्रुछत्र हरपल्यानंतर, दुकान व व्यवसायातून इम्तियाज व त्यांचा लहान भाऊ फैय्याज यांच्यात प्रॉपर्टीवरून वाद सुरू आहे. त्यामुळे ते कुटुंबासह एप्रिल २०२४ पासून सात्विक नगरमध्ये वास्तव्य करु लागले. तेव्हा फैय्याजने जानेवारी ते फेब्रुवारी २०२४ मध्ये हरसूल (Harsul) येथील दोघांच्या सामाईक मालकीच्या जमिनीवर राईस मिल टाकण्यासाठी कृषी विभागात अर्ज केला.
तेव्हा संबंधित यंत्रणांनी स्पाॅट व्हिजिट केली. प्रकरण मार्गी लागत असतानाच फैय्याजने इम्तियाज यांच्या सिल्व्हर ट्रेडर्स व न्यू सिल्व्हर ट्रेडर्स या दोन्ही फर्मचे कागदपत्रे मिळवून ५० लाखांच्या कृषि कर्जासाठी शरणपूर राेडवरील कुलकर्णी गार्डनजवळील एचडीएफसी बँकेत अर्ज केला. बँकेत दाेघा भावांचे ज्वाईंट खाते उघडून त्याने इम्तियाज यांचे आधार कार्ड व पॅन कार्ड सादर करुन अकांउट ओपनिंग फॉर्मवर त्यांची बनावट (Fake) सही केली. कर्ज मंजूर झाल्याची प्रकिया जवळपास पूर्णत्वास येत असतानाच, कृषि कर्जासाठी आवश्यक नियमानुसार, फैय्याजने सात लाख ३० हजारांची रक्कम या खात्यात भरली. त्यानुसार आता त्याला ताब्यात घेतले जाणार आहे.