Monday, November 25, 2024
Homeक्राईमNashik Crime News : ऑफिस बॉयनेच दिली मालकाची सुपारी; दरोड्यासाठी केली रेकी

Nashik Crime News : ऑफिस बॉयनेच दिली मालकाची सुपारी; दरोड्यासाठी केली रेकी

नाशिक, कोपरगावमधून टोळी जेरबंद

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सिमेंटमालकाला लुटण्यासाठी साथीदारांना सुपारी देणार्‍या ऑफिस बॉय (Office Boy) आणि त्याच्या पाच जणांच्या टोळीला गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने (Gangapur Police Crime Branch) सीसीटीव्ही फुटेज आणि डम्प डाटाच्या आधारे गजाआड केले आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा (Son) समावेश असून, तीन जण रेकॉर्डवरील आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : तरुणावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला

याबाबत अधिक माहिती अशी की,ऑफिस बॉय जयेश चंद्रकुमार वाघ (रा.पाईपलाईन रोड, गंगापूररोड, नाशिक) उदय राजेंद्र घाडगे (२८, रा. मोनाली अपार्टमेंट, पंचवटी इलाईट हॉटेलमागे, त्र्यंबकेश्वर रोड, नाशिक, मूळ रा. कोपरगाव, जि. अहमदनगर), रोहित किशोर लोहिया, (तिघेही रा. कोपरगाव, जि. अहमदनगर), विराज कैलास कानडे , संकेत किशोर मंडलिक अशी अटक केलेल्या संशयितांची (Suspected) नावे आहेत. सिमेंट व्यावसायिक (Cement Professional) शारिक शेख, दीपक खताळे व ऑफिस बॉय जयेश वाघ हे कारने महात्मानगर पाण्याच्या टाकीजवळ १७ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास आले. ते दिवसभरात झालेल्या व्यवसायाची रक्कम दोन लाख रूपये घेऊन त्यांच्या डाक सेवा मंडळ बिल्डींगमधील ऑफिसजवळ होते.

हे देखील वाचा : Nashik News : मालेगावमध्ये डाळिंब इस्टेट मंजूर; मंत्री दादा भुसेंच्या पाठपुराव्याला यश

यावेळी शारीक शेख व दीपक खताळे हे रक्कम घेऊन कारमधून खाली उतरले. ऑफिस बॉय जयेश वाघ कार पार्क करत होता. त्यावेळी शारीक शेख व दीपक खताळे यांच्यावर चार अनोळखी युवकांनी (Youth) चाकू, लाकडी दांडा व मिरची पावडरने हल्ला केला. संशयितांनी खताळे यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला केला. त्यावेळी शेख व खताळे यांनी हल्ला करणार्‍यांना प्रतिकार केला असता संशयितांनी खताळे यांच्या डोक्यावर वार केले. त्यात ते जखमी झाले. त्यानंतर संशयितांनी शेख यांच्यावरही चाकू हल्ला केला. खताळे व शेख हे रोख रक्कम घेऊन शेजारच्या बिल्डींगच्या पार्किंगमध्ये पळाले असता हल्लेखोरांचा डाव फसला. यानंतर संशयित दुचाकीवरून पळून गेले.

हे देखील वाचा : कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा ई-शुभारंभ

दरम्यान, याप्रकरणी दीपक खताळे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) फिर्याद दाखल केली होती. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) पोलीस उपआयुक्त, किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जुमडे, पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत (गुन्हे), गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, हवालदार रवींद्र मोहिते, पोलीस हवालदार गिरीष महाले, गणेश रेहरे, सचिन काळे, पोलीस अंमदार मच्छिंद्र वाकचौरे, सुजित जाधव, सोनू खाडे, भागवत थविल, शिवम साबळे यांनी केली. तपास सहायक निरीक्षक निखील पवार व अंमलदार समाधान आहेर करीत आहेत.

हे देखील वाचा : भारतीय गोलंदाजांसमोर बांगलादेशची नांगी; विजयासाठी ९५ धावांचे आव्हान

असा मिळाला ठावठिकाणा

गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व अंमलदारांनी परिसरातील शेकडो सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले. त्यात चारही हल्लेखोरांनी घटनास्थळ परिसरात विविध ठिकाणी थांबून रेकी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून तांत्रिक विश्लेषणाव्दारे हल्लेखोरांचा ठावठिकाणा शोधून काढला. हल्लेखोर नाशिक, कोपरगाव, शिर्डी व राहाता येथील असल्याचे समोर आले. यात उदय घाडगे याने ऑफिस बॉय जयेश वाघ याच्या सांगण्यावरून दरोडा टाकल्याचे सांगितले. त्यासाठी घाडगे याने त्याचा कोपरगाव येथील मित्र संकेत मंडलिक (रा.कोपरगाव) याच्या ओळखीने संशयित आरोपी रोहित, विराज व एका विधीसंघर्षित बालकास नाशिक येथे बोलावून घेतले. त्यांना १६ ऑगस्ट २०२४ रोजी ऑफिस बॉय जयेश याने तो काम करीत असलेल्या शारीक शेख यांच्या ऑफिसमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या