Monday, October 14, 2024
Homeनाशिककापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा ई-शुभारंभ

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा ई-शुभारंभ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

२०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना (Farmer) अनुदान वितरणाचा ई-शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राज्य मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) करण्यात आला. हे अनुदान ऑनलाइन (Online) पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत असून पहिल्या टप्प्यात ४९ लाख ५० हजार खातेदारांच्या (Account Holders) खात्यांमध्ये २३९८ कोटी ९३ लाख रुपये जमा करण्यात येत आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : IND vs BAN 2nd Test : भारतीय गोलंदाजांसमोर बांगलादेशची नांगी; विजयासाठी ९५ धावांचे आव्हान

यामध्ये राज्यातील एकूण सुमारे ९६ लाख खातेदार या योजनेतून लाभासाठी पात्र असून, आधार संलग्न माहिती व अन्य प्रक्रिया पूर्ण होतील, तसे टप्प्याटप्प्याने उर्वरित शेतकरी बांधवांना देखील लाभ वितरित केला जाईल असे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. या योजनेसाठी नाशिक जिल्ह्यात (Nashik District) कापूस (Cotton) उत्पादनामध्ये ४६०४० इतके लाभार्थी असून यापैकी ३२७८३ लाभार्त्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे. तर सोयाबीनचे (Soyabean) १ लाख ८२ हजार ५४१ इतके लाभार्थी असून यापैकी १ लाख १६ हजार ८८७ इतके ई-केवायसी पूर्ण झालेली आहे. यापैकी १ लाख १५ हजार ९६३ ई-केवायसी पूर्ण झालेली आहे. मात्र ३३ हजार ७०७ ई-केवायसी अपूर्ण आहे.

हे देखील वाचा : Devendra Fadnavis : “लोकसभा निवडणुकीत वोट जिहाद झाले”; फडणवीसांचा रोष नेमका कुणावर?

ई-केवायसी तात्काळ करण्याचे आवाहन

सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी अर्थसहाय्य योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तात्काळ ई-केवायसी (EKYC) करावी असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी (Agricultural Officer) शिवाजी आमले यांनी केले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या