Wednesday, October 9, 2024
Homeक्रीडाIND vs BAN 2nd Test : भारतीय गोलंदाजांसमोर बांगलादेशची नांगी; विजयासाठी ९५...

IND vs BAN 2nd Test : भारतीय गोलंदाजांसमोर बांगलादेशची नांगी; विजयासाठी ९५ धावांचे आव्हान

कानपूर | Kanpur

भारत आणि बांगलादेश (India and Bangladesh) दुसरा कसोटी (Test Match) सामना कानपूर (Kanpur) येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय संघ (Team India) विजयाच्या दिशेने कूच करताना दिसत आहे. कारण या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी बांगलादेशला दुसऱ्या डावामध्ये १४६ धावांवर ऑल आऊट केले आहे. त्यामुळे भारताला जिंकण्यासाठी आता ९५ धावांची आवश्यकता आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Devendra Fadnavis : “लोकसभा निवडणुकीत वोट जिहाद झाले”; फडणवीसांचा रोष नेमका कुणावर?

आजच्या सत्रात सकाळी बांगलादेशने २६-२ वरून खेळायला सुरूवात केली होती. यानंतर आर. अश्विनने मोमिनुल हकला बाद करत विकेटचा श्रीगणेशा केला. त्यानंतर रविंद्र जडेजाने तीन विकेट, जसप्रीत बुमराहने तीन आणि आकाशदीप याने एक विकेट घेतली. मुशफिकुर रहीम याने भारताला शेवटची विकेट मिळवून दिली नाही. रोहितने नेहमीप्रमाणे बॉल जसप्रीत बुमराहकडे सोपवला आणि त्याने मुशफिकुरलाच बाद करत बांगलादेशचा गाशा गुंडाळला.

हे देखील वाचा : IND vs BAN 2nd Test : भारताला मालिका विजयाची सुवर्णसंधी?

बांगलादेशकडून मुशफिकुर रहीम शेवटपर्यंत मैदानात तळ ठोकून राहिला होता. मुशफिकुर याने ६३ बॉलमध्ये ३७ धावा केल्या. मात्र त्याला दुसऱ्या बाजून कोणी साथ दिली नाही. पहिल्या डावातील शतकवीर मोमिनुल हक अश्विनने चौख्या दिवशीच माघारी पाठवलं होतं. दुसऱ्या डावामध्ये बांगलादेशच्या पाच फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. नजमुल हुसेन शांतो १९ धावा, शाकिब अल हसन ० धावा, लिटन दास ०१ धाव, मेहदी हसन मिराझ ९ धावांवर स्वस्तात परतले.

हे देखील वाचा : छत्रपती संभाजीराजेंच्या संघटनेला निवडणूक आयोगाकडून पक्ष म्हणून मान्यता; चिन्हही मिळाले

दरम्यान, दुसऱ्या डावात बांगलादेशकडून शादमान इस्लामने चोख भूमिका बजावली. त्याने अर्धशतकी खेळी साकारली. भारतीय मैदानावर अर्धशतक झळकावणारा तो बांगलादेश संघाचा पहिला सलामीवीर ठरला. पण आकाशदीपने त्याला बाद केले. बांगलादेश संघाच्या धावफलकावर ९३ धावा झालेल्या असताना तो तंबूत परतला. तर बांगलादेशने ९४ धावांवर आपली सातवी विकेट गमावली. जडेजाने घेतलेल्या या महत्वपूर्ण विकेटमुळे भारतीय संघ विजयाच्या जवळ पोहोचला असताना बांगलादेश संघाचा यष्टीरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमने अखेरपर्यंत चिवट झुंज दिली. त्यामुळे बांगलादेशला १४६ धावापर्यंत मजल मारता आली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या