Sunday, June 14, 2026
HomeनाशिकNashik Crime : एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीचा विनयभंग

Nashik Crime : एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीचा विनयभंग

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

एकतर्फी प्रेमातून (One Side Love) ‘रोडरोमिओ’ने आग्रा रोडवरील एका नामांकित महाविद्यालयाच्या (Collage) पार्किंगमध्ये शिरून विद्यार्थिनीचा (Girl) विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. राहुल विष्णू काशिद (वय २४) असे संशयिताचे नाव आहे. पीडितेच्या फिर्यादीवरुन आडगाव पोलिसांत त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

- Advertisement -

संशयित व पीडिता एकाच महाविद्यालयात शिक्षण (Education) घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. १५ मेपासून पीडितेने संशयितासोबत बोलणे बंद केले होते. तेव्हापासून सातत्याने तिचा पाठलाग करुन त्रास देण्याचा प्रयत्न काशीद करीत होता. शनिवारी (दि. २) सायंकाळी महाविद्यालय संपल्यानंतर पीडिता पार्किंगमध्ये जात असताना संशयिताने तिचा रस्ता अडवला.

तसेच ‘माझ्यासोबत का बोलत नाही’ म्हणूण त्याने वाद घातला. पीडितेचा हात पिरगळून ‘तू इन्स्टाग्रामवर कोणाला लाइक व फॉलो करते’, असा जाब विचारला. त्यानंतर ‘तू मला आवडतेस, माझ्याशी बोलली नाहीस तर परिणाम वाइट होतील’, अशी धमकी दिली. त्यानंतर पीडितेने पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. संशयित पसार झाला असून पोलिस (Police) त्याचा शोध घेत आहे.

ताज्या बातम्या

Udaipur Intercity Express accident : मोठी दुर्घटना! आग लागल्याची अफवा पसरल्याने...

0
उदयपूर । Udaipur भय आणि घबराट माणसाकडून काय करून घेईल याचा नेम नसतो, पण कधीकधी हीच घबराट प्राणांतिक ठरते, याचाच एक अत्यंत दुर्दैवी प्रत्यय मध्य...