नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
देवळाली गाव (Deolali Gaon) परिसरात पत्नीने (Wife) घरात ठेवलेली २ लाख ४० हजार रुपयांची रोकड पतीनेच चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, मुस्कान सादिक खान ऊर्फ मुस्कान हैदरअली खान (रा. विद्याविनय सोसायटी, देवळाली कॅम्प) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, त्यांच्या पतीनेच हिव्या रंगाच्या पर्समध्ये ठेवलेली रोख रक्कम ०२ लाख ४० हजार रोख रक्कम लबाडीच्या इराद्याने चोरून नेली. संशयिताचे (Suspected) नाव हैदरअली खान ऊर्फ तेजस अनिल गांगुर्डे (रा. राजवाडा, देवळाली गाव) असे आहे.
दरम्यान, याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध (Husbend) चोरीचा गुन्हा (Case) दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहे. तर या घटनेमुळे परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे.





