Sunday, October 4, 2026
HomeनाशिकNashik Crime : रक्षाबंधनानिमित्त माहेरी जाणाऱ्या दोन महिलांचे पाच तोळ्याचे दागिने लंपास

Nashik Crime : रक्षाबंधनानिमित्त माहेरी जाणाऱ्या दोन महिलांचे पाच तोळ्याचे दागिने लंपास

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

रक्षाबंधनानिमित्त (Raksha Bandhan) माहेरी जाणाऱ्या दोन महिलांच्या (Women) पर्समधून तब्बल पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना आज (शनिवारी) दुपारच्या सुमारास नाशिकरोड बस स्थानकात (Nashik Road Bus Stand) घडली.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, कुसुम भालेराव (रा. जेलरोड) यांच्या पर्समधून दोन तोळ्यांचे कानातले आणि रोख रक्कम, तर ज्योती जेजुरकर (रा. माडसांगवी) यांच्या पर्समधून साडेतीन तोळ्यांची सोन्याची (Gold) पोत असा एकूण पाच तोळ्यांचा ऐवज चोरीस गेला. दोन्ही महिला नाशिकरोड येथून एमएच १४ एल एक्स ८८९१ या शिर्डीकडे जाणाऱ्या महामंडळाच्या बसने प्रवास करत होत्या.

यावेळी नाशिकरोड बसस्थानकातून बस सुटल्यावर दागिने (Jewelry) चोरीस गेल्याचे लक्षात आल्याने महिलांनी आरडाओरडा केला. यानंतर बस तातडीने नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) आणण्यात आली व सर्व प्रवाशांची चौकशी करण्यात आली. मात्र चोरट्याचा सुगावा लागला नाही. यानंतर चौकशी पूर्ण झाल्यावर बस शिर्डीकडे रवाना करण्यात आली.

दरम्यान, या घटनेमुळे प्रवाशांमध्ये (Passenger) भीतीचे वातावरण असून, बस स्थानक व प्रवासी बसमध्ये सुरक्षा उपाय वाढविण्याची मागणी होत आहे. रक्षाबंधनानिमित्त नाशिकरोड बस स्थानकात महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी या महिलांचे दागिने चोरून नेले असावे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अद्यापही गुन्हा (Case) दाखल झाला नसल्याचे समजते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : तीन नेते, दोन तास अन् आमराईत काय शिजले?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोधचा फॉर्म्युला आकाराला येणार की राजकीय आखाडा रंगणार, याचा फैसला होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना शनिवारी सोनईच्या ‘आमराईत’...