Thursday, March 13, 2025
Homeक्राईमNashik Crime : कंत्राटी शिक्षकाकडून अपहरण

Nashik Crime : कंत्राटी शिक्षकाकडून अपहरण

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत बेपत्ता मुलीचा तीन वर्षांनी छडा, तरुण अटकेत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील आडगाव परिसरातून (Adgaon Area) गेल्या तीन वर्षांपूर्वी १६ वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता झाली असताना नाशिक शहर पोलिसांनी (Nashik City Police) ऑपरेशन मुस्कानअंतर्गत सखोल तपास करुन तिला नागपुरातून धुंडाळून काढले आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हेशाखेकडील एएचटीसी पथकाने कारवाई दरम्यान, गोपनीय पद्धतीने शाळेतच सापळा रचून संशयित अपहरणकर्त्या शिक्षकास व पीडित मुलीस ताब्यात घेत नाशिक गाठले. पीडिता अल्पवयीन असतानाच तिची ओळख संशयिताशी (Suspect) झाली होती. त्यानंतर त्याने तिला फूस लावत नाशिकमधून यवतमाळ व नागपूर येथे पळवून नेल्याचे तपासात समोर आले आहे.

- Advertisement -

आनंद किसनराव शिरसाठ (वय-३५, सध्या रा. नागपूर) असे संशयित शिक्षकाचे नाव असून त्याला अटक करुन पीडितेसह त्याचा ताबा आडगाव पोलिसांकडे देण्यात आला आहे. तीन ते चार वर्षांपूर्वी आडगाव पोलीस ठाणे हद्दीत वास्तव्य करणाऱ्या परजिल्ह्यातील एका कुटुंबाकडे विदर्भातील मूर्तिजापूर येथील १५ ते १६ वयोगटातील मुलीस तिच्या आई वडिलांनी राहण्यासाठी पाठविले होते. मात्र, फेब्रुवारी ते मार्च २०२२ या कालावधीत ही मुलगी अचानक बेपत्ता झाली. तिचा शोध घेऊनही सापडली नसल्याने आडगाव पोलिसांत अनोळखी संशयितावर अपहरणाचा (Kidnapping ) गुन्हा नोंदविण्यात आला होता. तत्कालिन तपासाधिकाऱ्यांनी प्रकरणाचा तपास केला असता त्यांना ठोस माहिती हाती लागली नाही. त्यामुळे तपास थंडावला होता.

दरम्यान, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik), उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत शहरातील विविध बेपत्ता व अपहरणाच्या गुन्ह्यांचा तपास करुन पीडितांचा व संशयितांचा शोध घेण्याचे निर्देश मध्यवर्ती गुन्हेशाखेचे (सीसीयू) वरिष्ठ निरीक्षक डॉ. आंचल मुदगल व पथकास दिले होते. त्यान्वये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक (एएचटीसी) पथकाने या प्रकरणाचा सखोल तपास करुन महत्त्वाचे लीड मिळविले.यात मुलीस पळवून नेणारा संशयित नागपूर येथाल एका खासगी शाळेत शिक्षक असून मुलगी देखिल तेथेच हजर असल्याची माहिती मिळवली. यानंतर मुद्गल यांच्या सूचनेने सीसीयूचे सहायक निरीक्षक प्रविण माळी, हवालदार गणेश वाघ व महिला अंमलदार वैशाली घरटे नागपूरला रवाना झाले.

पोलीस बनले विद्यार्थ्यांचे पालक

नागपुरातील यशोधरा पोलीस ठाणे हद्दीतील न्यू मंगलवाडी चौकालगत असलेल्या एका खासगी शाळेत संशयित शिक्षक शिरसाठ व अपहृत मुलगी उपस्थित असल्याची माहिती पथकास मिळाली. कोणताही सुगावा लागू न देता हवालदार गणेश वाघ यांनी वेशांतर करत शाळेच्या बाहेर लक्ष ठेवले, तर, सहायक निरीक्षक प्रविण माळी व महिला अंमलदार वैशाली घरटे हे विद्यार्थ्यांचे पालक बनून शाळेत गेले. तेव्हा घरटे यांनी अपहृत मुलीला ताब्यात घेतले. तसेंच शिरसाठ पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना माळी आणि वाघ यांनी त्यास शिताफीने पकडून ताब्यात घेतले.

मुद्दे

सध्या पीडितेचे वय अठरा वर्षांहून अधिक
पीडितेची पाच वर्षांपासून शिरसाठशी ओळख
पीडिता मूळगावी असतानाच शिरसाठच्या संपर्कात
ओळख झाल्यावर दोघांत प्रेमसंबंध
दोघे संगनमताने पळून गेल्याचे तपासात उघड
अपहरणाच्या गुन्ह्याचा तीन वर्षांनी उलगडा
मुलीसह, कुटुंबाचे होणार समुपदेशन

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...