Sunday, September 22, 2024
Homeक्राईमNashik Crime News : सोने चोरी करुन बंगालला पळणारा ताब्यात

Nashik Crime News : सोने चोरी करुन बंगालला पळणारा ताब्यात

नाशिक | Nashik

- Advertisement -

पुणे (Pune) येथे सोन्याच्या दागिन्यांची (Gold Jewelry) चोरी करून पश्चिम बंगालमध्ये पसार होण्याच्या तयारीतील चोरट्यास नाशिक पोलिसांच्या (Nashik Police) मदतीने नाशिकरोड रेल्वेस्थानकात सिनेस्टाइल पद्धतीने बेड्या ठोकण्यात आल्या. या चोरीच्या गुन्ह्यातील दुसऱ्या संशयित चोरट्याला मुंबई भाईंदर येथून ताब्यात घेतले आहे. दोघांकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : पतीची गळफास घेऊन आत्महत्या; कौटुंबिक कलहातून घटना

पुणे शहरातील (Pune City) फरासखाना पोलीस ठाणे हद्दीत सुमारे ३२ लाख १६ हजार रुपये किमतीचे ४८० ग्रॅम वजनाचे अर्धवट तयार केलेले सोने नोकराने चोरी (Thief) केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित अमित पाल हा मुंबई येथे असल्याची माहिती गुन्ह्याचे तपास अधिकारी उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी मुंबई येथे जाऊन संशयिताचा शोध घेतला. मात्र, संशयित मुंबई येथून पश्चिम बंगालमध्ये रेल्वेमार्गे पलायन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती त्यांना मिळाली.

हे देखील वाचा : Nashik Crime News : लाकडाच्या भुकटीआड मद्यतस्करी; पाठलाग करुन वाहन पकडले

त्यानुसार पुणे पोलिसांनी सातपूर पोलीस ठाण्यात (Satpur Police Station) कार्यरत उपनिरीक्षक राकेश न्हाळदे यांना माहिती देत मदत मागितली. न्हाळदे यांनी संशयिताचे वर्णन जाणून घेत,तत्काळ नाशिक रोड रेल्वेस्थानक गाठले. नाशिक रोड पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक अजित शिंदे, अंमलदार दत्तात्रय वाजे, जीआरपीएफ पोलीस निरीक्षक सचिन बनकर आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने संशियाताचा शोध घेतला. मात्र, रेल्वे अवघ्या काही मिनिटांपूर्वीच रेल्वेस्थानकाहून निघाल्याने पोलिसांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून रेल्वे थांबविण्यास सांगितले. रेल्वे थांबताच पोलिसांनी सिनेस्टाइल पद्धतीने संशयित अमित राबी पाल (२१, रा. अंबिका पॅलेस, सी. विंग, रूम नं. ३११, भाईंदर पूर्व, मूळ गाव पश्चिम बंगाल) याला बेड्या ठोकल्या.

हे देखील वाचा : Nashik Crime News : सावकारीचा पाश सुटेना; दोघांचा शोध सुरू

साथीदारही ताब्यात

अमित पालच्या मुसक्या आवळल्यानंतर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे, सहायक उपनिरीक्षक मेहबूब मोकाशी, पोलीस हवालदार नितीन तेलंगे, पोलीस नाईक महेश राठोड, पोलिस कर्मचारी गजानन सोसुने यांनी मुंबईत त्याच्या साथीदाराचा शोध घेतला असता, भाईंदर येथून मुकेश काशीनाथ पंखिरा (२७, रा. अंबिका पॅलेस, सी. विंग, रूम नं. ३११, भाईंदर पूर्व. मूळ गाव पश्चिम बंगाल) याला ताब्यात घेतले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या