Tuesday, June 16, 2026
Homeक्राईमNashik Crime : तीनशे मुजोर रिक्षाचालकांना 'दणका'; काहींच्या रिक्षा, कागदपत्रे जप्त

Nashik Crime : तीनशे मुजोर रिक्षाचालकांना ‘दणका’; काहींच्या रिक्षा, कागदपत्रे जप्त

अनेक सराईत चालक पसार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गुन्हेगारी नियंत्रणाचा दुसऱ्या टप्प्यात शहर पोलिसांनी (City Police) गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर (Rickshaw Pullers) कायदेशिर कारवाईचे ‘गंडांतर’ आणले आहे. गेल्या चार दिवसांत शहर पोलिसांनी तीनशेहून अधिक बेजबाबदार रिक्षाचालकांना दणका देऊन त्यांच्याकडून हमीपत्र (बॉन्ड) लिहून घेतले आहे.दरम्यान, कारवाईच्या भीतीने काही रिक्षाचालक भूमिगत झाले असून भाडेतत्वावर रिक्षा चालविणाऱ्या काहींनी रिक्षा थेट मालकाच्या दारात उभ्या केल्याचे दिसते.

- Advertisement -

विशेष म्हणजे या ‘धडक’ कारवाईतून काही सराईत चालक अलगद निसटत असल्याचा दावा काही प्रवाशांनी केला आहे. पोलिसांच्या नव्या कारवाईचे स्वागत होत असून तेराही पोलीस ठाण्यांच्या (Police Station) हद्दीत स्थानिक पोलीसांसह वाहुतकशाखेच्या सातही युनिटने बेशिस्त वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.त्यातील काहींचे पोलीस ठाण्यातच दिवाळी ‘फटाके’ फोडण्यात आले आहेत. शहरातील मध्यवर्ती ठिकाणे, उपनगरांसह रिक्षाथांबे आणि भररस्त्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांना वठणीवर आणण्यासाठी चालकांवर थेट भारतीय न्याय संहिता २८५ व मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हे दाखल केले जात आहेत.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या आदेशाने वाहतुक शाखेच्या उपायुक्त किरिथिका सी. एम. यांनी शहराच्या वाहतुक व्यवस्थेची पाहणी करुन आवश्यक पावले उचलली आहेत. वाहतुक शाखेचे सहायक आयुक्त सुधाकर सुराडकर, अद्विता शिंदे, ट्रॅफिकची एकूण सात युनिट आणि तेराही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रस्त्यावर धिंगाणा घालणारे व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे रिक्षाचालक व काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे रिक्षा व टॅक्सी तसेच ट्रकचालक या कारवाईत अडकत चालले आहेत.

आधारकार्ड जमा, समन्स बजावून सुटका!

कारवाईत साठहून अधिक चालकांचे संबंधित पथकांसह अमलदारांनी आधारकार्ड जमा केले. त्यांना कडक शब्दांत इशारा देत ‘समन्सपत्र’ लिहून घेतले. त्यावर चालकांच्या सह्या घेऊन नंतर त्यांच्या रिक्षा सोडण्यात आल्या.

अशी आहेत कारवाईची कारणे

  • चौक व रस्त्यावर बेशिस्तपणे रिक्षा उभी करणे
  • गणवेश परिधान न करता रिक्षा चालवणे
  • इतर वाहनांना ये-जा करण्यास अटकाव करणे
  • सार्वजनिक ठिकाणी वाहतूककोंडी करणे
  • बेशिस्तपणे रिक्षा उभी करणे

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...