Sunday, January 25, 2026
Homeक्राईमNashik Crime : शिलेदाराला हिसका अन् शेरनीच्या डरकाळ्या; आणखी काही...

Nashik Crime : शिलेदाराला हिसका अन् शेरनीच्या डरकाळ्या; आणखी काही संभावित बालेकिल्ल्यानजीक

काळ्या काचेने केला गेम

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

खुनाचे गुन्हे (Murder Case) पण सध्या जामिनावर अशी पार्श्वभूमी असताना पांढरा सदरा घालून शहरभर ऐटीत फिरणारा शेरनीचा ‘खास शिलेदार’ केवळ कारच्या काळ्या काचेमुळे शहर पोलिसांच्या (City Police) फेऱ्यात सापडला. स्वाभिमानाला ठेच पोहोचल्याने साहजिकच शेरनीशी त्याने संपर्क केला. शेरनीनेही ही कारवाई फारच मनाला लावून घेत डरकाळ्या फोडल्याने पोलिसांनी कायदेशीर कारवाईबाबत माहिती देत ‘सुटका’ केल्याचे कळते. मात्र, हा फेरा भविष्यात व्यापक होण्याची दाट शक्यता असून हा ‘पॅटर्न’ अशाच पठडीतील अनेकांची पाचावर धारण बसवू शकतो.

- Advertisement -

‘हिंदुत्वाची झालर’ अंगावर ओढून राजकीय कारकीर्द मजबूत करणाऱ्या भाजपच्या एका आघाडीच्या या पदाधिकाऱ्याने नुकताच वाहतूक नियमांचा भंग केल्याने शहर पोलिसांनी रीतसर कारवाई केली. कामगार मोर्चाचीही जबाबदारी पाहणाऱ्या या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी एकाच दिवसात दोनदा दंड ठोठावला. त्यामुळे त्याची खुमखुमी काहीशी उतरल्याचे माहीतगार सांगतात.

YouTube video player

‘कायद्याचा बालेकिल्ला’ या मोहिमेत ऑक्टोबरपासून आतापर्यंत नाशिक पोलिसांनी (Nashik Police) ‘राजाश्रय’ असणाऱ्या अनेक संशयितांसह सराईत गुन्हेगारांना ‘खास मेजवानी’ दिली आहे. तर, ‘बालेकिल्ला पॅटर्न’साठी ‘विशेष सन्मान’ यादीत निवड झालेल्या व केवळ सध्याच्या ‘वागणुकी’ मुळे पोलिसांपासून अजून तरी सुरक्षित अंतर राखण्यात यशस्वी झालेला हा मंडळाचा अध्यक्ष वाहतूक नियमांच्या उल्लंघनामुळे अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला. काचा काळ्या असल्याने पोलिसांनी त्याची कार अडवत नियमाप्रमाणे चलान फाडले. त्याने साहजिकच शेरनीला फोन केला. तिनेही त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत शहर पोलीस प्रमुखांपर्यंत कारवाईबाबत चिडचीड करत खदखद व्यक्त केली.

पोलिसांनी कायदेशीर कारवाईबाबत (Action) माहिती देत मुक्त केले; मात्र ‘त्या’ फोननंतर पुढील टप्प्यात याच पदाधिकाऱ्यावर पुन्हा काळ्या काचांमुळे ‘डबल’ दंडात्मक कारवाई केल्याचे समजते. बालेकिल्ल्यापासून थोड्याच अंतरावर असलेला हा पदाधिकारी लवकरच ‘टप्प्यात’ येणार असल्याचे समजते. सावज अडकल्यावर शेरनी काय पाऊल उचलणार, याची आता उत्सुकता आहे. त्याच्यासह अनेकांवरील कारवाया अटळ असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

ताज्या बातम्या

राज-का-रण : सिव्हिलची ‘शल्यक्रिया’ कधी होणार ?

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक सिव्हिल हॉस्पिटल हे खरंतर गोरगरिबांना चांगले उपचार मिळवून देऊन त्यांचे आशीर्वाद घेण्याचे ठिकाण. तेथे आरोग्याच्या दर्जेदार...