Tuesday, June 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Crime : युनिट एकची मोठी कारवाई; तीस ग्रॅम MD पावडरसह तब्बल...

Nashik Crime : युनिट एकची मोठी कारवाई; तीस ग्रॅम MD पावडरसह तब्बल सतरा लाखांचा मुद्देमाल जप्त

एका महिलेसह तिघांना अटक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहर पोलिसांच्या (City Police) गुन्हे शाखा युनिट एकच्या (Unit One) पथकाने मंगळवारी (दि. ३०) रात्री उशिरा द्वारका परिसरातील एका हॉटेलमध्ये छापा (Raid) टाकून अंदाजे ४. ५ लाखांच्या ३० ग्रॅम मॅफेड्रोनसह (एमडी) सुमारे १७. १५, १०० लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. शहरात गुन्हेगारीचा (Criminal) मुद्दा चर्चेत असताना अंमली पदार्थांसंदर्भात झालेल्या या कारवाईमुळे पोलीस पुन्हा सक्रीय झाल्याचे समोर येत आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिसांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती. यानंतर त्यांनी द्वारका परिसरातील (Dwarka Area) एका हॉटेलवर छापा टाकून मुज्ज्फर मैनुद्दीन शेख (रा. भोईवाडा कथडा, भद्रकाली, नाशिक), फरहान शेख ( रा. बागवानपुरा ), अनिल वर्मा ( रा. तपोवन रोड ) आणि हीना कापसे ( रा. निलगिरी बाग ) यांना ताब्यात घेतले. यानंतर त्यांच्याकडून तीस ग्रॅम एमडी पावडर, वाहन आणि मोबाईलसह अंदाजे साडे सतरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.

दरम्यान, ही कारवाई गुन्हेशाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. आंचल मुदगल यांच्या पथकाने केली. तर पकडण्यात आलेले ड्रग्ज पेडलर रेकॉर्डवरील असून याआधी एमडीची लिंक मुंबई, ठाणे वाशी व घाटकोपर पर्यंत विस्तारल्याचे समोर आले असताना आताच्या कारवाईतील एमडी (MD) कुठून आणण्यात आले, याचा तपास सुरु आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : ‘आरोग्यवर्धिनी’वर सहा लाख नाशिककरांचा विश्वास; ओपीडीत तपासणी, शहरात...

0
नाशिक | फारूक पठाण | Nashik सर्वसामान्य नागरिकांना मोफत आणि घराजवळच दर्जेदार प्राथमिक आरोग्यसेवा देण्याच्या उद्देशाने नाशिक महानगरपालिकेने (Nashik NMC) सुरू केलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रांवर (Arogyavardhini...