Wednesday, June 17, 2026
Homeक्राईमNashik Crime : न्यायाधिशांच्या घरातील चोरी उघड; दोघे सराईत ताब्यात

Nashik Crime : न्यायाधिशांच्या घरातील चोरी उघड; दोघे सराईत ताब्यात

नाशिकरोड पोलिसांची कारवाई

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik

नाशिकरोड परिसरातील (Nashik Road Area) सेवानिवृत्त न्यायधीशांच्या (Judge) घरी चोरी करणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांच्या मुसक्या नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने आवळल्या आहेत. याच घरफोड्यांनी मुंबई नाक्याच्या हद्दीतही प्राध्यापिकेच्या घरात घरफोडी केल्याचे उघड झाले असून दोन्ही घरफोडीतील सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल नाशिकरोड पोलिसांनी जप्त केला आहे.

- Advertisement -

जॉय उर्फ भुऱ्या विजय नानाजी (२६), चेतन कैलास सोनवणे (दोघे रा. शरणपूर झोपडपट्टी कॅनडा कॉर्नर, नाशिक) अशी संशयितांची नावे आहेत. नाशिकरोड (Nashik Road) गुन्हेशोध पथकाचे अंमलदार विशाल पाटील यांना संशयित जॉय हा चोरलेले सोने विक्री करण्यासाठी सिन्नर फाटा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार रविवारी (दि. २७) रात्री पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर दोघांनी दोन आठवड्यांपूर्वी दोन घरफोड्या (Robbery) केल्याची कबुली दिली. संशयितांकडून २० हजारांची रोकड, १ लाखांची एक किलोची चांदीची वीट, दीड लाखांची सोन्याची लगड आणि ३० हजारांचा मोबाईल असा ३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

दरम्यान, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ दोनचे उपायुक्त किशोर काळे, सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी, उपनगरचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या सूचनेने गुन्हेशोध पथकाचे पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे, सहायक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, उपनिरीक्षक संदीप पवार, अंमलदार विशाल पाटील, अरुण गाडेकर, विष्णू गोसावी, महेंद्र जाधव, सागर आडणे, रोहित शिंदे, योगेश रानडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून सभासद संस्थांच्या (सेवा सोसायट्यांच्या) प्रतिनिधींचे ठराव 17...