Friday, June 26, 2026
HomeनाशिकNashik News : विजेचा धक्का लागून ६० वर्षीय कामगाराचा मृत्यू

Nashik News : विजेचा धक्का लागून ६० वर्षीय कामगाराचा मृत्यू

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

अंबड औद्योगिक वसाहत (Ambad Industrial Estate) परिसरातील एक्सलो पॉइंटजवळ रंगकाम करत असताना विजेचा धक्का लागल्याने एका ६० वर्षीय कामगाराचा मृत्यू (Death) झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. कय्यूम सलीम खान (वय ६०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्सलो पॉइंट परिसरात असलेल्या अशोका विहार इमारतीच्या (Building) मागील बाजूस कय्यूम खान हे रंगकामाचे काम करीत होते. काम सुरू असताना त्यांचा पाय विद्युत डीपीजवळ गेल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात (Civil Hospital) दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार झोले करीत आहेत.

ताज्या बातम्या

पंढरपूरला जाणार्‍या वारकर्‍यांसाठी रेल्वेची खास घोषणा

0
सोलापूर | Solapur आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी लाखो वारकर्‍यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने मोठा दिलासा दिला आहे. यंदा आषाढी वारीसाठी 54 विशेष रेल्वे...