नाशिक | प्रतिनिधी | Nashik
देशात ‘तिहेरी तलाक ही प्रथा बेकायदेशीर आणि असंवैधानिक ठरवण्यात आली असताना नाशिक शहरात या अघोरी प्रथेचा जाच अद्यापही सुरू असल्याचे वास्तव समोर आले आहे. पत्नीचा शारीरिक, मानसिक छळ करून, तिला मारहाण करत गर्भपातास कारणीभूत ठरलेल्या एका संशयित पतीविरुद्ध मुंबईनाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांतील शहरातील ‘ट्रिपल तलाक’चा (Triple Talaq) हा पाचवा गुन्हा ठरला आहे.
हे देखील वाचा : Rupali Chakankar : नाशिकमध्ये SIT कडून रुपाली चाकणकरांची कसून चौकशी; अशोक खरात प्रकरणावर दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित मलिक अशरफ समशेर (२८, रा. अल्फाद रेसिडेन्सी, पखालरोड) हा दिंडोरीतील (Dindori) जऊळकेत भंगार विक्रीचा व्यवसाय करतो. त्याने पीडितेशी फेब्रुवारी २०२२ मध्ये रजिस्टर पद्धतीने विवाह केला होता. विवाहानंतर काही काळ संसार सुरळीत सुरू असताना समशेरने पीडितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. जानेवारी २०२५ मध्ये संशयिताने (Suspected) पीडितेला अमानुष मारहाण केली. त्यातून पीडितेच्या पोटातील भ्रूणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतरही पीडितेचा छळ थांबला नाही.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातशी बिल्डरांचे लागेबांधे; काळा पैसा पांढरा करण्याचा डाव
शिवाय ३० जानेवारी २०२६ रोजी मलिकने पीडितेच्या मोबाईलवर फोन (Mobile Phone) केला. शिवीगाळ करत फोनवरच ‘आज से तू हलाल नही हराम हो गई… मैं होश ओ हवास में बोल रहा हूं, तलाक, तलाक, तलाक’ असे म्हणत बेकायदेशीररीत्या काडीमोड दिला. त्याने हा संवाद रेकॉर्ड केल्याचेही पीडितेला धमकावत सांगितले. मुस्लीम महिला (विवाह हक्कांचे संरक्षण) कायदा २०१९ नुसार तोंडी किंवा लेखी स्वरुपात एकदाच तीन वेळा तलाक देणे हा अजामीनपात्र गुन्हा असून, यात दोषी आढळल्यास पतीला तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे.
आयुक्तांकडे कैफियत मग गुन्हा
पीडितेने या छळाला कंटाळून शुक्रवारी (दि. ९) पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्याकडे कैफियत मांडली. आयुक्तांनी मुंबईनाका पोलिसांना आदेश दिले. त्यानुसार, पोलिसांनी गंभीर दखल घेत संशयित पतीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम व मुस्लीम महिला (विवाहाच्या अधिकारांचे संरक्षण) कायदा २०१९ चे कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हवालदार खान करत आहेत.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : शिर्डीतील जमीन व्यवहार मान्य; खरातची पोलिसांत कबुली, पुन्हा एसआयटीच्या ताब्यात
नाशिकमधील गुन्ह्यांचा आलेख
पहिला गुन्हा : १ सप्टेंबर २०२३ (इंदिरानगर पो.स्टे.)
दुसरा गुन्हा : २३ एप्रिल २०२५
तिसरा गुन्हा : २२ ऑगस्ट २०२५
चौथा गुन्हा : २९ नोव्हेंबर २०२५
पाचवा गुन्हा : ८ मे २०२६ (मुंबई नाका पो.स्टे.)





