Wednesday, September 16, 2026
Homeक्राईमNashik Crime News : दारूसाठी मुलाकडून वृद्ध आईची हत्या; गंगापूर भागातील घटना

Nashik Crime News : दारूसाठी मुलाकडून वृद्ध आईची हत्या; गंगापूर भागातील घटना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दारूला पैसे दिले नाही म्हणून पोटच्या मुलाने स्वतः च्या आईवर धारदार हत्याराने वार करून तिची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना गंगापूर पोलीस ठाण्याच्या (Gangapur Police Station) हद्दीतील हनुमान नगर परिसरात घडली. या घटनेत कमलाबाई अनाजी वळवी (६५) यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी संशयित मुलगा तानाजी वळवी (४०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर परिसरातील मोतीवाला कॉलेजच्या मागील बाजूस असलेल्या हनुमान नगर परिसरात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास कमलाबाई वळवी यांच्यावर हत्याराने डोक्यात हल्ला करण्यात आला. अतिरक्तस्रावाम ळे गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. डायल ११२ वरून घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

प्राथमिक माहितीनुसार, संशयित तानाजी वळवी याला दारूचे व्यसन असून, दारूच्या नशेतून हा हल्ला झाल्याचा पोलिसांचा (Police) प्राथमिक अंदाज आहे. मात्र, हत्येमागील नेमके कारण काय, तसेच घटनेपूर्वी आई आणि मुलामध्ये काही वाद झाला होता का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. गंगापूर पोलिसांनी संशयित तानाजी वळवी याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. घटनेतील धारदार हत्यारासह इतर पुरावे पोलिसांकडून तपासले जात आहेत. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ताज्या बातम्या

मनोज

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचे बीपी, शुगर लेवल घटली, उपचार घेण्यास...

0
जालना | Jalanaमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहे. सततच्या उपोषणामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाढली आहे. उपोषणाच्या १९व्या दिवशी त्यांचा रक्तदाब (BP)...