नाशिक | प्रतिनिधी | Nashik
स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवून घेणाऱ्या अशोककुमार खरात (Ashok Kharat) या भोंदूचा मुखवटा पूर्णपणे फाटला आहे. खरातने केलेल्या अन्याय, अत्याचार आणि अघोरी कृत्यांचा पर्दाफाश करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) हेल्पलाइनवर तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडत आहे. दररोज ८ ते १० कॉल्स येत असून, खरातच्या ‘काळ्या साम्राज्या’चे धागेदोरे आता पोलिसांच्या हाती लागत आहेत.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : खरातने ‘व्यवसायात वृद्धी होईल’ असे सांगून उकळले तब्बल ‘इतके’ लाख; पीडितांचे एसआयटीला कॉल
एसआयटीने (SIT) जारी केलेल्या आणि ९५०३२७०२२४ ७७७५८१६३८९ या क्रमांकांवर केवळ पीडित महिलाच नव्हे, तर खरातने आर्थिक नुकसान केलेले व्यावसायिक आणि त्याच्या जाचाला कंटाळलेले पूर्वाश्रमीचे भक्तही संपर्क साधत आहेत. भोंदूगिरी, जादूटोणा आणि छळाच्या अशा काही कहाण्या समोर येत आहेत ज्या ऐकून पोलीस प्रशासनही (Police Administration) चक्रावून गेले आहे. खरातच्या कामकाजाची पद्धत आणि त्याच्या रहस्यांबाबत अनेक खळबळजनक माहिती हेल्पलाइनद्वारे पोलिसांपर्यंत पोहोचत आहे. एसआयटीच्या प्रमुख व पोलीस अधीक्षक तेजस्वी सातप्ते संपूर्ण प्रकरणाची संविस्तर तपासणी करत आहे.
तपासाचा फेरा आवळला!
खरातवर दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी एसआयटीने आता कंबर कसली आहे. सध्या पीडितांचे सविस्तर जबाब नोंदवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. धक्कादायक म्हणजे, अनेक निष्पाप कुटुंबांना या भोंदूच्या दारात नेऊन सोडणाऱ्या ‘मध्यस्थांची’ ही आता चौकशी केली जात आहे. तपासाच्या या टप्प्यात अद्याप कोणालाही नोटीस किंवा समन्स बजावण्यात आले नसले तरी, पुरावे हाती लागताच मोठी कारवाई करण्याचे संकेत सूर्यवंशी यांनी दिले आहेत.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : ‘नो चेक, ओन्ली कॅश’; नाशिकचा ‘एप्स्टीन’ खरातला धनादेशावर अविश्वास
पीडितांना ‘खाकी’चा आधार
अनेक महिला पीडिता खरातच्या दहशतीमुळे तक्रार करण्यास घाबरत होत्या. मात्र, पोलिसांनी पुढाकार घेत या महिलांचे समुपदेशन सुरू केले आहे. “प्रत्येक कॉलची गांभीयनि दखल घेतली जात असून पीडितांना धीर दिला जात आहे,” अशी माहिती एसआयटीचे अधिकारी व कळवण विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी दिली. पोलिसांच्या या भूमिकेमुळे आता आणखी काही पीडित महिला आणि फसवणूक झालेले व्यावसायिक अधिकृत फिर्याद नोंदवण्यासाठी पुढे येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे खरातच्या दुष्कृत्यांचा आकडा डझनच्यावर जाऊ शकतो.
हे देखील वाचा : Ashok Kharat Case : नीलम गोऱ्हे देखील खरातला भेटल्या, नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील हॉटेलमध्ये…; तृप्ती देसाईंच्या आरोपाने खळबळ





