Friday, September 18, 2026
HomeनाशिकAshok Kharat News : भोंदू खरातचा कारागृहातील मुक्काम कायम; सरकारी पक्षाचा तीव्र...

Ashok Kharat News : भोंदू खरातचा कारागृहातील मुक्काम कायम; सरकारी पक्षाचा तीव्र विरोध अन् वकिलांची गैरहजेरी

'या' तारखेच्या सुनावणीकडे लक्ष

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

देवी शक्तीचा दावा करत महिला भाविकांवर लैंगिक अत्याचार आणि नागरिकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात (Nashik Road Central Jail) असलेला भोंदू अशोककुमार एकनाथ खरात (Ashok Kharat) याच्या जामीन अर्जावरील सस्पेन्स वाढला आहे. बुधवारी (दि. १६) या प्रकरणी न्यायालयात सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे आता ३० सप्टेंबर रोजी या अर्जावर पुढील सुनावणी होणार असून, खरातचा कारागृहातील मुक्काम तूर्तास कायम राहिला आहे.

- Advertisement -

​या खटल्याचे गांभीर्य लक्षात घेता राज्य सरकारने (State Goverment) विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. अॅड. निकम यांनी न्यायालयात स्वतः हजर राहत खरातच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध दर्शवला आहे. खरातवर दाखल असलेल्या गुन्ह्यांचे स्वरूप गंभीर असून, त्याला जामीन मिळाल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो अथवा तपासात अडथळा निर्माण करू शकतो, असा युक्तिवाद करत न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळावा, अशी विनंती अॅड. निकम यांनी केली. ​दुसरीकडे, ३० ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान खरातच्या बाजूने वकीलच हजर न राहिल्याने बचाव पक्षाची बाजू न्यायालयासमोर मांडली जाऊ शकली नव्हती. आता बुधवारीही सुनावणी टळल्याने जामिनाचा निर्णय ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलला गेला आहे.

 गुन्ह्यांची जंत्री

राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू खरातविरोधात नाशिक शहर, नाशिक ग्रामीण आणि अहिल्यानगर (अहमदनगर) ग्रामीण पोलीस ठाण्यांमध्ये बलात्कार, फसवणूक, अवैध सावकारी आणि मनी लाँड्रिंगसारख्या गंभीर कलमांखाली एकूण ८ गुन्हे दाखल आहेत. या सर्व प्रकरणांचा सखोल तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने मजबूत पुरावे गोळा केले आहेत. एसआयटीने तपास केलेल्या ८ गुन्ह्यांपैकी ६ गुन्ह्यांचे दोषारोपपत्र जिल्हा सत्र न्यायालयात दाखल आहे.

या गुन्ह्यासाठी अर्ज

सध्या खरातने सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) दाखल एका लैंगिक अत्याचार प्रकरणातून मुक्ततेसाठी (जामिनासाठी) अर्ज केला आहे. नाशिकसह इतर जिल्ह्यांत पसरलेले खरातचे जाळे आणि एसआयटीने न्यायालयात सादर केलेले ठोस दोषारोपपत्र यामुळे खरातच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता ३० सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद आणि बचाव पक्षाची बाजू ऐकून न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

ताज्या बातम्या

ऑस्कर

मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाचा क्षण; ९९ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी ‘गोंधळ’ चित्रपटाची अधिकृत...

0
मुंबई | Mumbaiमराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची आणि भारतीय सिनेसृष्टीसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी ऑस्कर २०२७ साठी भारताकडून संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ या मराठी...