Friday, September 18, 2026
Homeक्राईमNashik Crime News: मध्यवर्ती कारागृहात गँगवॉर उफाळला; कैद्याला १० ते १२ कैद्यांकडून...

Nashik Crime News: मध्यवर्ती कारागृहात गँगवॉर उफाळला; कैद्याला १० ते १२ कैद्यांकडून मारण्याची धमकी

नाशिक | प्रतिनिधी
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील मानल्या जाणाऱ्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात प्रशासनाचा वचक संपुष्टात आल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. उच्चस्तरीय समित्यांची पाहणी आणि न्यायालयाचे ताशेरे यांना केराची टोपली दाखवत, कारागृहाच्या भिंतींमागे पुन्हा एकदा भाईगिरी आणि गँगवॉर भडकल्याचे स्पष्ट झाले आहे. १५ सप्टेंबर रोजी दुपारी कारागृहातील सर्कल नंबर ७, बॅरेक नंबर – ०३ मध्ये एका न्यायाधीन कैद्यावर तब्बल १० ते १२ कैद्यांनी जीवघेणा हल्ला चढवून फ्री स्टाईल हाणामारी केल्याची घटना घडली आहे.

पोलिसांच्या माहितीसह दाखल फिर्यादीनुसार, न्यायाधीन बंदी क्रमांक नितीन उर्फ सुनिल हिरामण शिंदे (वय ३४) यास कोणत्याही कारणाशिवाय संशयित बंदीवान अजय रायकर, जतिन बच्छाव, उमेश पाटील, संतोष दळवी, रोहीत पवार, गौरव गोसावी, सुजल जाधव, देव वाघमारे, इम्रान सैय्यद आणि इतर १० ते १२ बंद्यांनी बेकायदेशीर जमाव जमवून खाली पाडले. त्याला हाताचापटाने, लाथाबुक्यांनी जबर मारहाण करत शिवीगाळ करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता, आमच्या नादी लागला तर तुझ्याकडे पाहून घेऊ असा धमकीवजा दमही टोळक्याने दिला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

- Advertisement -

आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी काँग्रेस, आता तृणमूल काँग्रेस…प्रत्येकवेळी तोच…; राहुल गांधींची पोस्ट चर्चेत

…कारवाई कधी ?
या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांत नवीन भारतीय न्याय संहितेतील गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे. यात स्वेच्छेने दुखापत पोहोचवणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, दंगल घडवून आणणे, गुन्हेगारी स्वरूपाची ताकीद देणे/धमकी देणे व शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे याचा समावेश आहे.

भाईगिरीचे केंद्र ?
यापूर्वी नाशिकरोड कारागृहात थेट तुरुंगाधिकाऱ्यांसह रक्षकांना चोप देण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. अमली पदार्थ, मोबाईल गॅजेट्स, धारदार शस्त्रास्त्रे मिळून येणे आणि मालेगाव न्यायालयाने कारागृह प्रशासनाच्या अनन्वित छळावर ओढलेले कडक ताशेरे… या सर्व बाबी कारागृहातील भोंगळ कारभाराची साक्ष देतात. उच्चस्तरीय समितीच्या गोपनीय अहवालानंतरही सुधारणा न होणे म्हणजे अभय तर नाही ना? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

ताज्या बातम्या

तृणमूल

तृणमूल काँग्रेसचं नाव बदललं! दोन्ही गटांना मिळालं नवं नाव अन् नवं...

0
कोलकाता | Kolkataकेंद्रीय निवडणुक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर पश्चिम बंगालच्या राजकारणाच्या वादात निवडणूक आयोगाने महत्त्वाचा अंतरिम निर्णय घेतला आहे....