Sunday, September 27, 2026
Homeक्राईमNashik Crime News : धर्मांतर रॅकेटचा संशय अन् ॲट्रॉसिटी? 'त्या' प्रकरणातील मुख्य संशयिताचा...

Nashik Crime News : धर्मांतर रॅकेटचा संशय अन् ॲट्रॉसिटी? ‘त्या’ प्रकरणातील मुख्य संशयिताचा जामीन फेटाळला

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील उच्चभ्रू कॅनडा कॉर्नर भागात दुचाकी हळू चालवण्याच्या किरकोळ कारणावरून महाविद्यालयीन तरुणावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याला (Attack) आता अत्यंत गंभीर वळण मिळाले आहे. या गुन्ह्यामागे धर्मांतर रॅकेट चालवले जात असल्याचा आणि संशयित आर्थिक रसद पुरवून आदिवासी व मागासवर्गीय तरुणांचे धर्मांतर करत असल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात (Court) केला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार व संशयित अजय प्रमोद श्रीवास्तव याचा जामीन अर्ज नाशिकच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी गुरुवारी (दि. २४) फेटाळून लावला.

- Advertisement -

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) एक महाविद्यालयीन विद्यार्थी १ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १०:५० वाजेच्या सुमारास आपल्या मित्रासह कॅनडा कॉर्नर येथील उमिया अपार्टमेंटजवळ थांबलेला होता. यावेळी संशयित दुचाकीवरून वेगाने जात असताना, पीडित तरुणाने त्याला गाडी हळू चालव, असे सांगितले. याचा राग आल्याने संशयिताने तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करत धर्मांतर करण्याची धमकी दिली. काही वेळातच तेथे १५ ते २० जणांच्या टोळक्याने येऊन तरुणाला व त्याच्या मित्राला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. संशयितांपैकी एकाने मंगेश कुलकर्णी याच्यावर दगड फेकून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एफआयआरमध्ये नावच नाही… 

२ सप्टेंबर रोजी अटक (Arrested) करण्यात संशयित अजय श्रीवास्तव याच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्यांनी जामिनाला तीव्र विरोध दर्शवला. एफआयआरमध्ये थेट नाव नसले तरी अजय श्रीवास्तव हाच गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार (मास्टरमाईंड) आहे. तो आर्थिकदृष्ट्या सक्षम असून, गरीब व आदिवासी समाजातील तरुणांना पैशांचे आमिष दाखवून ख्रिश्चन धर्मांतरासाठी फूस लावत आहे का, किंवा याचे रॅकेट कार्यरत आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे, असे सांगितले. संशयित सुटल्यास तो तक्रारदार, साक्षीदार यांना धमकावू शकतो आणि तपासात अडथळा आणू शकतो. तसेच इतर पसार संशयितांना अटक करणे बाकी असून साक्षीदारांचे जबाब नोंदवणे बाकी आहे, असे सांगितले.

​बचाव पक्षाचा दावा आणि कोर्टाचे निरीक्षण

संशयित अजय हा घटनेच्या वेळी घटनास्थळी हजर नव्हता तर तो स्वतःच्या घरी होता. त्याच्या घरातील सीसीटीव्ही फूटेज पेनड्राईव्हद्वारे न्यायालयात सादर करण्यात आले आहे. ​मात्र, न्यायालयाने हे फूटेज फेटाळताना स्पष्ट केले की, बचाव पक्षाने सादर केलेल्या पेनड्राईव्हमधील फूटेजची तपास अधिकाऱ्यांकडून न्यायवैद्यक आणि तांत्रिक पडताळणी होणे बाकी आहे. त्यामुळे या टप्प्यावर त्यावर विश्वास ठेवणे घाईचे ठरेल.

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : राहुल गांधींचे उद्दिष्ट संविधानाचे रक्षण नव्हे, तर संवैधानिक...

0
मुंबई | Mumbai विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेवरून आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधकांकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM...