Thursday, May 21, 2026
Homeक्राईमNashik Crime News : सात वेळा गर्भपात, पतीचे अनैतिक संबंध आणि वेडे...

Nashik Crime News : सात वेळा गर्भपात, पतीचे अनैतिक संबंध आणि वेडे ठरवण्याचा कट; विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्यांविरुद्ध गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

२१ व्या शतकातही जातीअंधतेची पाळेमुळे समाजात किती खोलवर रुजलेली आहेत, याचे धक्कादायक वास्तव नाशिकमध्ये (Nashik) समोर आले आहे. आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका उच्चशिक्षित विवाहितेचा सासरच्या मंडळींनी तब्बल ७ वेळा सक्तीने गर्भपात घडवून आणल्याची अमानुष घटना उघडकीस आली आहे. ‘तू आमच्या जातीची नाहीस, तुझे मूल आमच्या रक्ताचे वारसदार होऊ शकत नाही,’ असा टोकाचा आक्षेप घेत सासू-सासऱ्यांनी पतीला चिथावणी देऊन हा क्रूर छळ केला. नाशिकच्या म्हसरूळ पोलिस ठाण्यात (Mhasrul Police Station) संशयित पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित उच्चशिक्षित महिलेने २०११ मध्ये संशयित पतीशी प्रेमविवाह केला होता. दोघांची जात वेगळी असल्याने या विवाहाला मुलाच्या आई-वडिलांचा तीव्र विरोध होता. विवाहानंतर हे दाम्पत्य सुरुवातीला नोकरीनिमित्त पुणे येथे स्थायिक झाले. मात्र, सासरच्या मंडळींनी ‘तू आमच्या समाजाची नाहीस,’ असे हिणवून पीडितेचा मानसिक व शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. सासरच्या लोकांची पीडित महिला जेव्हा जेव्हा गरोदर राहिली, तेव्हा तेव्हा सासू आणि सासऱ्यांनी ‘हिच्या पोटी जन्माला आलेले मूल आमच्या जातीचे सभासद होणार नाही, अशी भूमिका घेतली.

त्यांनी पतीचे (Husbend) कान भरून त्याला चिथावणी दिली. स्वतःच्याच पत्नीच्या आरोग्याची आणि भावनांची पर्वा न करता, पतीने सासरच्यांच्या दबावाखाली येऊन गेल्या काही वर्षांत पीडितेची इच्छा नसतानाही तब्बल सात वेळा सक्तीने तिचे गर्भपात घडवून आणले. पीडितेने या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एका मुलाला आणि मुलीला जन्म दिला. काही दिवसांपूर्वी हे कुटुंब नाशिकमधील मखमलाबाद रोड परिसरात (Makhmalabad) वास्तव्यास आले असता, तिथेही सासूने बळजबरीनेपीडितेचा गर्भपात घडवून आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पतीचे अनैतिक संबंध आणि वेडे ठरवण्याचा कट

शारीरिक आणि मानसिक छळाच्या या दुष्टचक्रात अडकलेल्या पीडितेला आणखी एक धक्का बसला. तिच्या पतीचे प्रियंका नावाच्या अन्य एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे तिच्या निदर्शनास आले. याविषयी पीडितेने पतीला जाब विचारला असता, पतीने तिला आणि पोटच्या मुलांना बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या छळाचा प्रतिकार पीडितेने करू नये म्हणून सासरच्या संपूर्ण कुटुंबाने मिळून कट रचला. पीडितेची मानसिक स्थिती ठीक नाही, ती वेडी आहे असे भासवून तिला मानसिक रुग्णालयात भरती करण्याचा आणि घरातून हाकलून देण्याचा प्रयत्न केला गेला. याबाबत गुन्हा नोंद झाला असून तपास हवालदार सदानंद फुगे करत आहेत.

ताज्या बातम्या

राज

मोठी बातमी! कल्याण स्थानकावरील परप्रांतीयांना मारहाण प्रकरण; राज ठाकरे दोषी की...

0
ठाणे | Thaneमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीला कलाटणी देणाऱ्या २००८ मधील परप्रांतीय मारहाण प्रकरणातील पहिल्या गुन्ह्याचा आज (२१ मे २०२६) अंतिम निकाल...