Monday, May 25, 2026
Homeक्राईमNashik Crime News : मजुरांचा घाम, मुकादम गब्बर! दोन लाख रुपये बुडवणाऱ्या...

Nashik Crime News : मजुरांचा घाम, मुकादम गब्बर! दोन लाख रुपये बुडवणाऱ्या मध्यस्थावर अखेर गुन्हा

नाशिक | Nashik

द्राक्षबागेत दिवस-रात्र घाम गाळूनही हक्काची मजुरी न देता गोरगरीब मजुरांना तब्बल पावणेदोन लाखाचा गंडवणाऱ्या संशयित (Suspected) मुकादमाविरुद्ध अखेर पंचवटी पोलिस ठाण्यात (Panchvati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशिकांत रामदास वाघ (रा. साकोरे मिग, ता. निफाड) असे या संशयिताचे नाव आहे. हक्काच्या मजुरीसाठी थेट पोलीस आयुक्तांच्या दारी धाव घेतल्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने पावले उचलली आहेत.

- Advertisement -

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) गारमाळ (पो. बेरवल) येथील किशोर सुनील निकुळे (२७) या तरुणासह गावातील १५ ते १६ मजूर हाताला काम शोधत असताना पंचवटीतील पेठरोड येथे पोहोचले. तेव्हा शशिकांत वाघ याने त्यांचा विश्वास संपादन केला. दरम्यान, वाघने १ फेब्रुवारी ते मार्च २०२४ या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील कामटीगाव येथे द्राक्ष खुडण्यासाठी आणि द्राक्ष कंपनीत चांगल्या मजुरीचे आमिष मजुरांना दाखवले. रोज एका माणसाला ३५० रुपये मजुरी देण्याचे ठरवून हा सर्व मजूरवर्ग सोलापूरला रवाना केला. द्राक्षबागेत या मजुरांनी सलग ३९ दिवस काम केले. हजेरीपत्रकानुसार सर्व मजुरांचे एकूण दोन लाख १८ हजार ४०० रुपये मजुरी झाली.

त्यापैकी वाघ याने मजुरांना केवळ ३० हजार रुपये आगाऊ (अॅडव्हान्स) म्हणून दिले आणि उर्वरित एक लाख ८८ हजार ४०० रुपये कंपनीतून पैसे मिळताच देतो, असे आश्वासन दिले. यानंतर, काम संपवून पंधराही मजूर त्र्यंबकेश्वरला परतले. त्यानंतर त्यांनी वारंवार शशिकांत वाघ याच्याकडे हक्काच्या पैशांसाठी तगादा लावला. मात्र, संशयिताने दरवेळी उडवाउडवीची उत्तरे देत मजुरांना रिकाम्या हाताने परत लावले. हक्काची पुंजी बुडाल्याचे लक्षात येताच मजुरांनी पंचवटी पोलिसांना तक्रार अर्ज दिला. त्यावरही योग्य कार्यवाही होत नसल्याने मजुरांनी नुकतीच पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती.

पोलीस आयुक्तांनी दिले आदेश

याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी दिले. त्यानुसार, पंचवटी पोलिसांनी दखल घेत शशिकांत रामदास वाघ याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सोनवणे करत असून, फरार संशयित मुकादमाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चक्रे फिरवली आहेत.

ताज्या बातम्या

सुप्रिया

आधी जावई-व्याहींसह पंतप्रधानांची भेट नंतर सुप्रिया सुळेंची केंद्र सरकारवर टीका; म्हणाल्या…

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन लेक रेवती सुळेच्या...