Friday, September 18, 2026
Homeक्राईमNashik Crime News : बनावट दाखल्यांवरून सरकारी फ्लॅट हडपला; धुळ्यातील बहीण-भावावर गुन्हा

Nashik Crime News : बनावट दाखल्यांवरून सरकारी फ्लॅट हडपला; धुळ्यातील बहीण-भावावर गुन्हा

फ्लॅट गहाण ठेवून पतसंस्थेकडून उकळले कर्ज

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अल्प उत्पन्न गटासाठी (एलआयजी) राखीव असलेली शासकीय कोट्यातील सदनिका बनावट कागदपत्रांच्या (Fake Document) आधारे पदरात पाडून घेणे आणि त्यावर लाखो रुपयांचे कर्ज लाटून शासनासह पतसंस्थेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी धुळ्यातील (Dhule) एका बहीण-भावावर नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

​प्रमोद संतोष भदाणे उर्फ पाटील (रा. सुलवाडे, ता. शिंदखेडा, जि. धुळे) आणि त्याची बहीण नंदिनी विजय सनेर (रा. मुक्ताई नगर, देवपूर, धुळे) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी गंगापूर रोडवरील अनूज को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीतील बॅडमिंटन प्रशिक्षक मकरंद मधुकर देव (वय ६०) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) दाखल फिर्यादीनुसार, हा प्रकार २००३ ते २०१९ या कालावधीत घडला. संशयित प्रमोद भदाणे याने अल्प उत्पन्न गटात मोडत नसतानाही, या गटाचे खोटे दाखले आणि बनावट कागदपत्रे तयार करून नाशिकच्या अप्पर जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकरणाकडे सादर केले.

या बनावट दस्तऐवजांच्या आधारे त्याने प्रशासनाकडून मंजुरी आदेश मिळवले. ​त्यानंतर, गंगापूर रोडवरील निर्मला कॉन्व्हेंट स्कूलच्या मागील अनुज को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीच्या ‘ए’ विंगमधील फ्लॅट क्रमांक १२ (जो अल्प उत्पन्न गटासाठी राखीव होता) मूळ जमीनमालकाकडून शासकीय दरात खरेदी केला. २५ एप्रिल २००६ रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीकृत दस्त (क्र. २७७७/२००६) करून ही सदनिका बेकायदेशीरपणे स्वतःच्या नावावर करून घेतली. उपनिरीक्षक भटू पाटील तपास करत आहेत.

​शासकीय नियमांची पायमल्ली

शासकीय आदेशानुसार या राखीव सदनिकेचे परस्पर हस्तांतरण करण्यास मनाई होती. तरीही प्रमोद भदाणे याने ७ मे २०११ रोजी नोटरीकृत बक्षीसपत्राद्वारे हा फ्लॅट बहीण नंदिनी सनेर हिच्या नावावर केला. या गैरव्यवहारात नंदिनी सनेर यांनी सोसायटीच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या मदतीने ठराव क्रमांक २ मंजूर करून घेतला आणि सोसायटीच्या दप्तरी स्वतःचे नाव नोंदवून घेतले. एवढ्यावरच न थांबता, स्वतः अधिकृत मालक नसतानाही खोटे शपथपत्र सादर करून ही सदनिका एका खाजगी पतसंस्थेकडे गहाण ठेवली. या गहाणखताच्या आधारे पती विजय रघुनाथ सनेर यांच्या व्यवसायासाठी तब्बल २० लाख रुपयांचे कर्ज लाटले.

ताज्या बातम्या

SIT चे कागदी घोडे नकोत, थेट MPSC अध्यक्षांची हकालपट्टी करा; रोहित...

0
पुणे (प्रतिनिधी) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभारावरून आणि परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका...