Tuesday, November 24, 2026
HomeनाशिकNashik Crime News : दप्तर फेकून विद्यार्थ्याला शिक्षा; बाल न्याय कायद्यांतर्गत गुन्हा,...

Nashik Crime News : दप्तर फेकून विद्यार्थ्याला शिक्षा; बाल न्याय कायद्यांतर्गत गुन्हा, खासगी क्लासेसवर नियंत्रण कोणाचे?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अभ्यास करताना क्लासमध्ये खोडकरपणा केल्याने विद्यार्थ्याला (Student) शिक्षा देणे आणि त्या शिक्षेचा अतिरेक करून त्याला मानसिक अथवा शारीरिक त्रास देणे, यातील सीमारेषा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रासबिहारी लिंक रोडवरील लक्ष्मी नारायण सोसायटीमध्ये चालणाऱ्या एका खासगी क्लासमध्ये १२ वर्षांच्या बालकाचे दप्तर फेकून देत गुडघ्यावर बसण्याची शिक्षा देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

- Advertisement -

या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात (Panchvati Police Station) क्लासचालकावर थेट बाल न्याय कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी क्सासचालकास नोटीस बजावून चौकशी सुरू केली आहे. या घटनेने शहरातील खासगी शिकवणी वर्गांवरील (प्रायव्हेट क्लासेस) प्रशासकीय आणि शासकीय नियंत्रणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. पंचवटी पाेलिसांच्या माहितीनुसार, रासबिहारी लिंक रोड, आशापुरा हार्डवेअरजवळ असलेल्या लक्ष्मी नारायण सोसायटीतील अभिजित मोरे यांच्या क्लासमध्ये(दि. २६) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादीचा बारा वर्षीय मुलगा इंग्रजी विषयासाठी क्लासला जात हाेता.

दरम्यान, त्याने सहविद्यार्थ्यांशी मस्ती व खोडकरपणा केला. यावरून क्लासचालक अभिजित मोरे यांनी मुलाला आरडाओरड करून धमकावले, त्याचे दप्तर फेकून दिले आणि वर्गाबाहेर बसण्याची शिक्षा देऊन क्लासबाहेर उभे केले. ​त्याच वेळी योगायोगाने संबंधित मुलाचे (Girl) वडील काही कामानिमित्त त्या परिसरातून जात असताना, त्यांना मुलगा भेदरलेल्या अवस्थेत क्लासबाहेर उभा असल्याचे दिसले. वडिलांनी चौकशी केली असता मुलाने घडलेला सर्व प्रकार सांगितला. बालकासोबत झालेल्या अशा वर्तणुकीमुळे आणि दमदाटीमुळे संतापलेल्या वडिलांनी थेट पंचवटी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली.

​गुन्हा दाखल; नोटीसवरून मुक्तता

पीडित मुलाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक सुनील पवार यांच्या सूचनेने भारतीय न्याय संहित कलम ३५१(२) आणि बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ चे कलम ७५ अन्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उपनिरीक्षक कैलास जाधव तपास करत असून पोलिसांनी संशयित क्लासचालकास नोटीस बजावून चौकशी केली आहे.

​खासगी क्लासेसवरील नियंत्रणाचा प्रश्न

सध्या शहरासह गल्लीबोळात हजारो खासगी ट्युशन क्लासेस सुरू आहेत. मात्र, या क्लासेसच्या कारभारावर, तेथील वातावरणावर किंवा तेथे बालकांना दिल्या जाणाऱ्या शिक्षेच्या पद्धतींवर कोणत्याही सरकारी किंवा शैक्षणिक यंत्रणेचे नियंत्रण नाही. मुलांनी खोडकरपणा केल्यास त्यांना समज देणे किंवा योग्य ती शिस्त लावणे आवश्यक असले, तरी शिक्षेचा अतिरेक करून बालमनावर आघात करणे कितपत योग्य, असा सवाल पालक वर्गातून विचारला जात आहे. अशा प्रकारच्या त्रासामुळे बालकांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ऊसदरावर निर्णय न झाल्यास शनिवारी रेलरोको-रास्तारोको

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या ऊसाला राज्यातील अन्य जिल्ह्याप्रमाणे भाव मिळावा, या मागणीसाठी 26 तारखेला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत...