Sunday, August 2, 2026
Homeक्राईमNashik Crime News : डिलिव्हरी बॉयला बांबूने मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Nashik Crime News : डिलिव्हरी बॉयला बांबूने मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

कारण नसताना कुरापत काढून ‘ब्लिंकईट’ कंपनीच्या एका डिलिव्हरी बॉयला तीन अज्ञातांनी बेदम मारहाण केल्याची घटना सातपूर परिसरातील (Satpur Area) पिंपळगाव बहुला शिवारात (Pimpalgaon Bahula Area) घडली आहे. मोबाईल दाखवण्यास नकार दिल्याचा राग धरून संशयितांनी हे कृत्य केले असून, सातपूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सातपूरच्या शिवाजीनगरातील धुम्रवर्ण रो-हाऊस (शिवाजीनगर) येथे राहणारा १८ वर्षीय शिवम संदीप जायभाय हा ‘ब्लिंकईट’ कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. २९ जुलै रोजी रात्री ९:४५ वाजेच्या सुमारास शिवम पिंपळगाव शिवारातील एका शैक्षणिक संकुलात ऑर्डर देण्यासाठी जात होता. ​त्यावेळी २० ते २२ वयाेगटातील संशयिताने त्याचा रस्ता अडवून थांबवले आणि “तुझा मोबाईल दाखव” अशी मागणी केली. शिवमने मोबाईल दाखवण्यास नकार दिला. यावर चिडलेल्या त्या अज्ञाताने “तू परत ये, तुला बघतोच” अशी धमकी दिली. ऑर्डर दिल्यानंतर शिवम त्या मार्गावरून परत येत होता, तेव्हा संशयिताने त्याच्यासोबत असलेल्या दोन ते तीन मित्रांसह त्याला पुन्हा अडवले.

संशयितांनी शिवीगाळ करत शिवमला हाताबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता,  हातातील बांबूने शिवमच्या उजव्या पायावर मारुन दुखापत केली. या अचानक झालेल्या हल्ल्यात व मारहाणीदरम्यान शिवमचा मोबाईल खाली पडल्याने त्याचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर पीडित शिवम जायभाय याने सातपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार राकेश बनकर तपास करत आहेत. मारहाण करणारे संशयित नेमके कोण होते, त्यांचा उद्देश काय होता, याबाबत पोलीस सध्या कसून चौकशी करत आहेत.

ताज्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नशामुक्त युवा – विकसित भारताचा संकल्प’...

0
नागपूर । वृत्तसंस्था Nagpur पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे ‘नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प' अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र...