Saturday, September 12, 2026
Homeक्राईमNashik Crime News : औषध कंपन्यांना पावणेदोन कोटींचा गंडा; अशोक स्तंभावर उघडले...

Nashik Crime News : औषध कंपन्यांना पावणेदोन कोटींचा गंडा; अशोक स्तंभावर उघडले बनावट ऑफिस

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील मोक्याचे ठिकाण असलेल्या अशोक स्तंभ परिसरातील ‘डॉक्टर हाऊस’ इमारतीमध्ये ऑफिस भाड्याने घेऊन, स्वतःला औषध उत्पादक व परवानाधारक भासवून देशभरातील औषध कंपन्यांना (Pharmaceutical Companies) कोट्यवधींचा गंडा घालणारे एक मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. ‘न्यूयान लाईफसायन्स’ या बनावट कंपनीच्या चाेरट्यांनी अहमदाबाद आणि झारखंड येथील दोन नामांकित कंपन्यांना १ कोटी ७३ लाख ७० हजार ३४३ रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) ‘भारतीय न्याय संहिता २०२३’ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

संशयितांनी (Suspected) जर्मनी आणि नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय औषध प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतल्याचे भासवून कंपन्यांचा विश्वास संपादन केला होता. आयएसओ सर्टिफिकेट’ आणि औषध परवान्याची बनावट कागदपत्रे (Fake Document) ईमेलद्वारे पाठवून तसेच स्वतःच्या बनावट वेबसाईटवर प्रदर्शित करून उच्चशिक्षित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनाही जाळ्यात ओढले. तीन महिन्यांच्या पुढील तारखेचे चेक देऊन माल उचलायचा आणि तो चेक वटण्याच्या आतच आणखी मोठी ऑर्डर देऊन पुन्हा पुढील तारखेचा चेक द्यायचा, अशी नवी शक्कल या रॅकेटने लढवली होती. पहिला चेक बँकेत जमा होण्यापूर्वीच संशयित ऑफिसला कुलूप लावून पसार झाले, असे समाेर आले आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक तलवारे या तपास करत आहेत. 

​अशी झाली १.७३ कोटींची फसवणूक

​उत्तरखंड येथील हल्दानीचे रहिवासी आणि ‘प्लाझा इंडस्ट्रीज प्रा. लि.’चे सेल्स मॅनेजर विनय कुमार ओमप्रकाश (वय ६२) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. एप्रिल २०२५ ते सप्टेंबर २०२५ या काळात संशयितांनी ‘प्रेगाबालिन’, ‘टेल्मीसार्टन’, ‘लेव्होसल्प्राईड’ आणि ‘एटोरिकॉक्सिब’ या महागड्या औषधी कच्च्या मालाची ऑर्डर दिली होती. यामध्ये अहमदाबाद येथील प्लाझा इंडस्ट्रीज प्रा. लिमिटेडने ७७,५९,११६ रुपये, झारखंडच्या सितारगंज येथील जीएन पाल स्पेशालिटी मॉलिक्युल्स एलएलपीचे ९६,११,२२७ रुपये असे एकूण एक काेटी ७३ लाख सत्तर हजार रुपयांच्या मालाचा अपहार करून दिलेले सर्व चेक बाऊन्स झाले.

​या आरोपींवर गुन्हा दाखल:

​१. तुषार (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात)

२. अथर्व भिकू वाघमारे (रा. कोपरखैरणे, नवी मुंबई)

३. सचिन भिकू मोरे (रा. नवघर, जि. ठाणे)

ताज्या बातम्या

मका प्रक्रिया उद्योगामुळे शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह आणि शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होणार –...

0
नाशिक, दि. 11 सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : जिमाका वृत्तसेवा चिंचोंडी औद्योगिक वसाहतीमध्ये सुखजित बायोकॉर्न लिमिटेडकडून सुमारे रूपये ७६० कोटींची गुंतवणूक असलेला अत्याधुनिक कृषी-आधारित अन्नप्रक्रिया उद्योग...