Sunday, June 14, 2026
Homeक्राईमNashik Crime News : विवाहाचे आमिष दाखवून तरुणीचा छळ; ५० लाखांची खंडणीही...

Nashik Crime News : विवाहाचे आमिष दाखवून तरुणीचा छळ; ५० लाखांची खंडणीही मागितली

नाशिक | Nashik

विवाहाचे आमिष दाखवून एका तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी तसेच तिच्याकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून नाशिकरोड पोलिसांनी (Nashik Road Police) दोघांसह इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा (Case) दाखल केला आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या चांदवड माहितीनुसार, तालुक्यातील २७ वर्षीय तरुणीची २०१७ मध्ये संशयित अविनाश वसंत निरभवणे याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाल्यानंतर संशयिताने वेळोवेळी तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, जुलै २०२५ मध्ये पीडितेची इच्छा नसताना तिच्याशी विवाह लावण्यात आला. त्यानंतरही तिचा छळ सुरूच ठेवण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच पीडितेचे फोटो आणि व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत ५० लाख रुपयांची (Money) मागणी करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

याशिवाय पीडितेच्या कुटुंबीयांशी तसेच तिचे ठरलेले लग्न असलेल्या कुटुंबाशी संपर्क साधून दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली. त्यामुळे संबंधित विवाह मोडल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) अविनाश वसंत निरभवणे, राहुल दवे व त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक किरण कोरडे करत आहेत.

ताज्या बातम्या

शेत रस्त्याच्या वादातून तरुणास मारहाण

0
मानूर | वार्ताहर Manur कळवण तालुयातील भादवण शिवारात शेतजमिनीच्या वहिवाट रस्ता वादातून एका तरुणासह त्याच्या वडिलांना मारहाण केली. यामुळे मारहाण झालेल्या युवकाने विष घेत आत्महत्या...