Monday, November 9, 2026
HomeनाशिकNashik Crime News : येवल्यात लग्नमंडपात राडा; दोन्ही गटांवर गुन्हे दाखल

Nashik Crime News : येवल्यात लग्नमंडपात राडा; दोन्ही गटांवर गुन्हे दाखल

येवला | प्रतिनिधी | Yeola

शहरातील आसरा लॉन्स येथे वृषभ भगुंडे आणि शिवानी बोरगुडे यांच्या विवाहसोहळ्या दरम्यान वधू-वरांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी (Beating) झाली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित जोडप्याने दोन महिन्यांपूर्वी कोर्ट मॅरेज केले होते. त्यानंतर आज, सकाळी हिंदू वैदिक पद्धतीने विवाह येवला शहरातील आसरा लॉन्स येथे होत होता.

- Advertisement -

यावेळी मुली कडील नातेवाईकांच्या बोलण्यातून वाद उफाळला व वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. यात दोन्ही बाजूकडील काहीजण जखमी झाले. पेट्रोलसदृश ज्वलनशील पदार्थ फेकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही या प्रकरणात करण्यात आला आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी (City Police) घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. पुढील तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

गोकुळ

‘गोकुळ’च्या सत्तेसाठी कोल्हापुरात संघर्षाची ठिणगी! समविचारी आघाडीचा सतेज पाटलांच्या नेतृत्वात महामोर्चा

0
कोल्हापूर | Kolhapurकोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’मधील सत्तासंघर्ष आता रस्त्यावर पोहोचला आहे. गोकुळमध्ये शासननियुक्त संचालक नेमण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेस आमदार...