Monday, October 12, 2026
Homeक्राईमNashik Crime News : सी फाॅर्मची माहिती लपविणे अंगलट; पाच नामांकित हॉटेल्सवर गुन्हे

Nashik Crime News : सी फाॅर्मची माहिती लपविणे अंगलट; पाच नामांकित हॉटेल्सवर गुन्हे

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरात हॉटेल व लॉजिंगमध्ये वास्तव्यास येणाऱ्या परदेशी नागरिकांसह (Citizen) बाहेरील संशयित व्यक्तींची माहिती, पासपोर्ट, व्हिसा आणि अधिकृत सी-फॉर्मची माहिती पोलीस ठाण्यात सादर करण्याचे पोलीस आयुक्तांचे स्पष्ट आदेश असतानाही, ही माहिती जाणीवपूर्वक लपवणाऱ्या ५ नामांकित हॉटेल व लॉजिंग चालकांवर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६८ अन्वये समक्ष बजावलेल्या नोटिसांना मुदतीत प्रतिसाद न दिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

​मुंबई नाका पोलीस ठाण्याचे (Mumbai Naka Police Station) हवालदार मनोज विष्णू गवळी (वय ३७) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, १ ऑगस्ट २०२६ ते ९ ऑक्टाेबर २०२६ या कालावधीत हॉटेलमध्ये उतरलेल्या पाहुण्यांची व परदेशी नागरिकांची माहिती १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस ठाण्यात सादर करणे बंधनकारक असल्याचे सांगून संबंधित हॉटेल्सना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली होती. ​मात्र, निश्चित मुदतीत माहिती सादर न केल्यामुळे व पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे, संबंधित ५ हॉटेल मालकांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत तपास हवालदार प्रवीण कुलथे करत आहेत.

सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्व

​द्वारका आणि वडाळा नाका (Dwarka and Wadala Naka) हा परिसर शहराचा मुख्य जंक्शन पॉईंट मानला जातो. या भागातून मोठ्या प्रमाणावर नागरिक ये-जा करत असतात. अशा वर्दळीच्या व संवेदनशील भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि बाहेरील व्यक्तींचा रेकॉर्ड पोलिसांकडे उपलब्ध असावा, या हेतूने पोलीस प्रशासनाने सी-फॉर्म भरण्याची प्रक्रिया सक्तीची केली आहे. या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून आता हॉटेल्सवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, या कारवाईमुळे नियम डावलणाऱ्या व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : राहुल गांधींचे संविधानिक संस्थांवर दबाव आणण्याचे मोठे षडयंत्र;...

0
मुंबई | Mumbai काँग्रेसने (Congress) सर्वोच्च न्यायालयावर (Supreme Court) काढलेली मोर्चाची हाक आणि सरन्यायाधीशांकडे चर्चेसाठी मागितलेली वेळ यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि विरोधी...