Tuesday, October 13, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis : राहुल गांधींचे संविधानिक संस्थांवर दबाव आणण्याचे मोठे षडयंत्र; CM...

Devendra Fadnavis : राहुल गांधींचे संविधानिक संस्थांवर दबाव आणण्याचे मोठे षडयंत्र; CM फडणवीसांचा घणाघात

मुंबई | Mumbai

काँग्रेसने (Congress) सर्वोच्च न्यायालयावर (Supreme Court) काढलेली मोर्चाची हाक आणि सरन्यायाधीशांकडे चर्चेसाठी मागितलेली वेळ यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसने आपल्या पराभवाचे खापर ‘ईव्हीएम’वर न फोडता स्वतःच्या नेतृत्वात बदल करण्याची गरज आहे, अशी टीका त्यांनी केली. तसेच राहुल गांधी हे वारंवार अपयशी ठरणारे नेतृत्व असून ते देशात अती-डाव्या (अल्ट्रा-लेफ्ट) विचारसरणीची मानसिकता आणि अराजकता पसरवण्याचे मोठे षडयंत्र रचत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला.

- Advertisement -

काँग्रेस स्वतःच्या बळावर संपली असून आत्मपरीक्षणाची गरज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “काँग्रेस पक्ष आणि त्यांची कथित ‘इंडिया’ आघाडी भारताच्या संविधानिक संस्थांवर सातत्याने हल्ले करत आहे, ज्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. देशातील प्रमुख १८ राज्यांनी अनेक दशकांपासून काँग्रेसला नाकारले आहे. तामिळनाडूने ५९ वर्षे, पश्चिम बंगालने ५० वर्षे, उत्तर प्रदेशने ४६ वर्षे, बिहारने ३६ वर्षे तर मध्य प्रदेशने २३ वर्षांपासून काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले आहे.” ज्या राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेत होती, तिथेही ती मायावती, डीएमके किंवा लालू प्रसाद यादव यांच्या आधारावर होती, स्वतःच्या बळावर काँग्रेस आता पूर्णपणे संपली आहे, असेही ते म्हणाले.

संविधानिक संस्थांवर दबाव आणण्याचे मोठे षडयंत्र

सलगच्या पराभवामुळे काँग्रेस अराजकतेच्या मानसिकतेत पोहोचली आहे असा घणाघात करताना फडणवीस म्हणाले, काँग्रेस हातात संविधान धरून तेच संपवण्याचे काम करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून उभारलेल्या निवडणूक आयोग, आरबीआय आणि सर्वोच्च न्यायालयासारख्या स्वायत्त संस्थांना बदनाम करण्याचे व लोकांच्या मनात अविश्वास निर्माण करण्याचे काम राहुल गांधी करत आहेत.

मोर्चासमोर सरन्यायाधीशांनी येणे कोणते संविधान? फडणवीसांचा सवाल

काँग्रेसने (Congress) सरन्यायाधीशांकडे केलेल्या चर्चेच्या मागणीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “सरन्यायाधीशांनी एखाद्या मोर्चासमोर येऊन चर्चा करावी, हे कोणते संविधान सांगते? सर्वोच्च न्यायालयाने यावर काँग्रेसला योग्य ते उत्तर दिले आहे. न्यायालय हे स्वतंत्र असून ते केवळ प्रकरणांवर सुनावणी करू शकते. परंतु, जाणीवपूर्वक न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीशांनी मोर्चासमोर येणे योग्य आहे का, यावर आता घटनातज्ज्ञांनीच भाष्य करावे,” असे आव्हान त्यांनी दिले.

ताज्या बातम्या

गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका! सांगली जिल्हा बँकेसाठीचा उमेदवारी अर्ज बाद;...

0
सांगली | Sangali सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपचे आक्रमक आमदार गोपीचंद पडळकर यांना उच्च न्यायालयाच्या...