Saturday, October 24, 2026
Homeक्राईमNashik Crime News : २७ बँकाना दीड काेटींचा गंडा; गुन्हे शाखेकडून एकास...

Nashik Crime News : २७ बँकाना दीड काेटींचा गंडा; गुन्हे शाखेकडून एकास अटक

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहर बँक असोसिएशन (‘न्युबा’) अंतर्गत जिल्ह्यातील २७ बँकांच्या संचालकांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष परिषदेच्या नावाखाली काेट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पुणे येथील ‘दीपक हॉलिडेज’चा संचालक संशयित राहुल दीपक रेवाळे याला गुन्हे शाखा युनिट (Unit One) एकने पुण्यातून अटक (Arrested) केली असून, आता त्याला गंगापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

- Advertisement -

​’न्युबा’ने डिसेंबर २०२५ मध्ये जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे एका विशेष परिषदेचे आयोजन करण्याची जबाबदारी राहुल रेवाळे याच्या ‘दीपक हॉलिडेज’ला सोपवली होती. नाशिकमधील २७ बँकांनी नोंदणी करत सुमारे ४०० जणांच्या निवास, खाणपाण आणि प्रवासाचा एक काेटी ६४ लाखांचा खर्च रेवाळेकडे सुपूर्द केला होता. मात्र, ऐनवेळी त्याने टाळाटाळ सुरु केली. “इराण – इस्त्रायल – अमेरिका यांच्यात युद्ध सुरू असून आंतरराष्ट्रीय तणावामुळे श्रीनगरमध्ये परिषद घेणे सुरक्षित नाही,” असे कारण पुढे करत त्याने ही परिषद पुढे ढकलली. रेवाळे याने नंतर, ‘न्युबा’च्या संचालक मंडळाला अंधारात ठेवण्यासाठी बनावटगिरी केली.

हॉटेल आणि ट्रॅव्हल्स बुकिंग झाल्याचे भासवणाऱ्या बनावट पावत्या आणि बिले तयार करून ती असोसिएशनला दाखवली. प्रत्यक्षात मात्र कोणतेही बुकिंग केले नसल्याचे समाेर आले आहे. एप्रिल ते जून या कालावधीत न्युबा प्रशासनाला अंधारात ठेवून हा सर्व कारभार सुरू होता. दरम्यान, मुंबईनाका पोलिसांच्या (Mumbai Naka Police) तपासानंतर या प्रकरणाचा ताबा आता गंगापूर पोलिसांकडे (Gangapur Police) देण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार देवरे गुन्ह्याचा तपास करत आहेत. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा हात आहे का, याचाही शोध पोलिस घेत आहेत.

पैसे इतरत्र गुंतवले; बाँडवर कबुली!

​प्राथमिक चौकशीत संशयित रेवाळे याने न्युबाकडून घेतलेली दीड काेटी रुपयांची रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी इतरत्र गुंतविल्याची कबुली दिली आहे. हे पैसे त्याने युको बँकेच्या खात्यावर आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे स्वीकारले होते. फसवणूक उघडकीस आल्यानंतर, त्याने हे पैसे लवकरच परत करू असे ‘बाँड पेपर’ वर लिहून दिले आहे. मात्र, बनावट पावत्यांचा खेळ करून बँकेची दिशाभूल केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई केली जात आहे.

मुद्दे

मुख्य संशयित राहुल दीपक रेवाळे (वय ३४, रा. पिंपरी चिंचवड, पुणे)
फर्मचे नाव, दीपक हॉलिडेज, एम स्पेस मॉल, खराळवाडी, पुणे.
नाशिक जिल्हा परिषद सहकारी बँकेची फसवणूक, पहिला गुन्हा नाेंद
तक्रारदार महेंद्र भिकचंद केदारे (वसुली अधिकारी, विश्वास को-ऑप बँक)
तक्रारीनुसार रु. ७,११,९००/- ची फसवणूक (न्युबा अंतर्गत एकूण व्यवहार १ कोटी ६४ लाखांचा असल्याचे समोर)
गंगापूर पोलिसांत दुसरा गुन्हा, तपास सुरु

 

ताज्या बातम्या

रील स्टार निघाले लुटारू! ९ हजारांची रोकड, सोन्याचे दागिने आणि दुचाकी...

0
पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) सोशल मीडियावर रील बनवून प्रसिद्धी मिळविणारेच लुटारू निघाल्याचा धक्कादायक प्रकार पाथर्डी तालुक्यातील शेकटे फाट्याजवळ घडल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. पाथर्डी-कोरडगाव रस्त्यावर...