Tuesday, May 7, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक शहरात रोज एका वाहनाची चोरी; दहा महिन्यात एवढे वाहने पळवली

नाशिक शहरात रोज एका वाहनाची चोरी; दहा महिन्यात एवढे वाहने पळवली

नाशिक । प्रतिनिधी

शहरात वाहन चोरीचे सत्र सुरू असून चालूवर्षी घडलेल्या सर्व गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक गुन्हे वाहन चोरीचे आहेत. मागील दहा महिन्यात आतापर्यंत 330 वाहने शहराच्या विविध भागातून चोरी झाली आहेत. यामुळे शहरातून सरासरी दररोज एका वाहनाची चोरी होत असल्याचे समोर येत आहे. तर वाहनचोरी गुन्ह्यांचा शोध लागण्याचे प्रमाण हे अवघे 16 टक्के इतके सर्वात कमी आहे…

- Advertisement -

शहर व परिसरातून वाहनांच्या चोरी होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मागील वर्षी 416 वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. यातील केवळ 82 गुन्ह्यांची उकल झाली असून शोधाचे हे प्रमाण केवळ 20 टक्के आहे. यंदाही सर्वाधिक गुन्हे वाहन चोरीचेच असून त्यांची संख्या 330 इतकी आहे. तर अवघ्या 52 गुन्ह्यांची उकल झाली असून शोधाचे हे प्रमाण यंदा केवळ 16 टक्के आहे. मागील वर्षीच्या तुलेत या चोर्‍या 86 ने कमीझाल्याचा केवळ दिलासा आहे.

चाकरमाने, मध्यमर्गीय नागरीकांसाठी वाहनांचे महत्व मोठे आहे. काबाड कष्टाचे पैशांची यासाठी गुंतवणुक केली जाते. तसेच त्यावरच रोजीरोटीही अवलंबून असल्याने सर्वसामान्य नागरीक वाहनांना लक्ष्मीचा दर्जा देतात.

दसरा दिवाळी या सनांना वाहनांची पुजा केली जाते. परंतु सर्वसमान्यांच्या याच लक्ष्मीला चोरट्यांनी लक्ष केले आहे. घराच्या पार्किंगमध्ये लॉक करून पार्क केलेली वाहने चोरटे अलगद उडवत आहेत. तर अनेकांची वाहने बसस्थानक, रेल्वे स्थानक, जिल्हा रूग्णालय, बाजार समिती, बँका अशा सार्वजनिक ठिकाणावरून लंपास झाली आहेत.

सायकल, दुचाकी, रिक्षा, चारचाकी ते अवजड ट्रकही चोरट्यांना वर्ज नाहीत अनेकदा तर ट्रक तसेच चारचाकी वाहनांचे टायर, बॅटर्‍या चोरट्यांनी लंपास केल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत.

चोरी झाल्यानंतर शोधूनही न सापडल्यास पोलीस ठाण्यांमध्ये चार पाच दिवसांनंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवला जातो. परंतु हा गुन्हा शरिर तसेच मालाविरूद्धच्या गुन्ह्यांप्रमाणारे प्रखर नसल्याचे मानले जात असल्याने तसेच शहरातील गुन्हे, कायदा सुव्यवस्था व त्या तुलनेत कमी असलेले पोलीस बळ यामुळे वाहनचोरीच्या गुन्ह्यांकडे दुर्लक्षच होत असल्याचे वास्तव आहे.

गुन्हे विभागांनी शोध घेऊन पकडलेल्या काही टोळ्यांचा अपवाद वगळता, दुसर्‍या गुन्ह्यात पकडलेल्या चोरट्याकडून वाहन चोरीची कबुली मिळाली तरच या गुन्ह्याचा शोध लागतो अन्यथा याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते.

गुन्ह्यांसाठी वापर

शहरातून चोरी झालेली अनेक वाहने नंबर प्लेट बदलून ग्रामिण भाग अथवा दुसर्‍या जिल्ह्यांमध्ये विनाकागदपत्रांची कमी किंमतीत विक्री केली जाते. तसेच शहरात काही गॅरेजमध्ये सर्व स्पेअर पार्ट वेगळे करून विकले जातात. यामुळे त्यांचा मागमुस लागत नाही. परंतु अशा चोरलेल्या वाहनांचाच वापर गंभीर अशा दरोडे, चोर्‍या, खून अशा गुन्ह्यांमध्ये झाल्याचे सातत्याने सामोरे आले आहे. तर काही ठिकाणी शस्त्रसाठा वाहतुक व बॉम्बसाठीही चोरलेल्या वाहनांचा वापर झाल्याचे समोर आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या