Saturday, June 20, 2026
HomeनाशिकNashik Crime News : मुंडे पॅटर्नचा धडाका; कारवाईच्या भीतीने गुटख्याची गोणी रस्त्यावर...

Nashik Crime News : मुंडे पॅटर्नचा धडाका; कारवाईच्या भीतीने गुटख्याची गोणी रस्त्यावर फेकली!

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

राज्यभरात गुटखा आणि पानमसाला (Gutkha and Panmasala) किंगचे धाबे दणाणले आहेत! अन्न व औषध प्रशासनाचे कडक शिस्तीचे आयुक्त तुकाराम मुंडे (Tukaram Mundhe) यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यात गुटखा विक्रीविरुद्ध तीव्र मोहीम सुरू आहे. याच धडक कारवाईच्या भीतीने नाशिकमध्ये एका गुटखा माफियांने पोलिसांच्या आणि एफडीएच्या भीतीने हजारो रुपयांचा मुद्देमाल चक्क रस्त्यावर फेकून पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

- Advertisement -

आडगाव नाक्याकडून द्वारका चौकाकडे जात असताना, कन्नवार पुलावरील पाईपलाईनजवळ गुटखा आणि तंबाखूच्या पुड्या मोठ्या प्रमाणात फेकून दिलेल्या अवस्थेत आढळल्या. एफडीए आणि पोलिसांचा (Police) ससेमिरा पाठीमागे लागल्याचे समजताच, संभाव्य अटक आणि कठोर कायदेशीर कारवाई टाळण्यासाठीच या तस्कराने हा संपूर्ण माल रस्त्याकडेला फेकून दिल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अलीकडेच शहर पोलिसांनी पहाटे कारवाई करताना पाच लाखांचा गुटखा सापळा रचून पकडला होता. नेहमी छुप्या मार्गाने गुटखा विकणारे आणि साठा करणारे माफिया आता कारवाईच्या भीतीने इतके हादरले आहेत की, हजारो रुपयांचा माल स्वतःच्या हाताने कचऱ्यासारखा फेकून देत आहेत. पण हा माल नेमका कोणाचा होता, याचा माग काढण्याची गरज आहे.

राज्यात गुटख्याचे नेटवर्क पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी आणि या काळ्या धंद्यातील गुन्हेगारांवर कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी प्रशासनाने आता सर्वात मोठे आणि अंतिम अस्त्र उपसले आहे. गुटख्याचा अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर आणि संघटित टोळ्यांवर आता थेट ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे धोरण प्रशासनाने अवलंबले आहे. या कडक धोरणामुळे गुटखा तस्करांचे धाबे दणाणले असून, नाशिकमधील (Nashik) ही घटना त्याचाच थेट परिणाम मानली जात आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या या ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे गुटखा माफियांचे नेटवर्क आता पूर्णपणे कोलमडण्याच्या मार्गावर आहे.

ताज्या बातम्या

NEET-UG 2026 : पेपरफुटीच्या वादानंतर उद्या नीटची फेरपरीक्षा; प्रशासन सज्ज

0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था New Delhi वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG 2026) उद्या, रविवार (२१ जून) रोजी पुन्हा घेतली जाणार...