Saturday, June 6, 2026
HomeनाशिकNashik Crime News :  'डॉन' बनण्याच्या इर्षेतून थेट गोळीबार; भाईगिरी कॅमेऱ्यात कैद

Nashik Crime News :  ‘डॉन’ बनण्याच्या इर्षेतून थेट गोळीबार; भाईगिरी कॅमेऱ्यात कैद

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

देवळालीगाव (Dolali Gaon) परिसरात बुधवारी मध्यरात्री एका तरुणावर गावठी कट्ट्यातून गोळीबार (Firing) करण्यात आला. प्राण वाचवण्यासाठी तिसऱ्या मजल्यावर पळत गेलेल्या तरुणाने भीती बाजूला सारून मारेकऱ्यांचा थेट ‘मोबाईल व्हिडिओ’ शूट करायला सुरुवात केली. स्वतःचा थरारक व्हिडिओ तयार होत असल्याचे पाहून ‘आम्हीच इथले डॉन’ अशी मर्दुमकी दाखविणाऱ्या तथाकथित भाईंची पुरती पाचावर धारण बसली आणि त्यांनी तिथून पळ काढला. या डिजिटल पुराव्यामुळे पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

- Advertisement -

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रितिक राजेंद्र पारचे (वय २५, रा. एनएमसी क्वार्टर, गांधीधाम) आणि संशयित राहुल निकम यांच्यात एक वर्षापूर्वी मोबाईलवरील (Mobile) मेसेजवरून वाद झाला होता. याच जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी आणि परिसरात स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठी ३ जून रोजी मध्यरात्री १२:३० च्या सुमारास राहुल निकम, त्याचा भाऊ किशोर ऊर्फ किशा निकम आणि एका अनोळखी इसमाने रितिकला गाठले. ​”तुला लय माज आलाय का? या एरियात सर्व आम्हाला हप्ता देतात. इथे भाई फक्त आम्हीच आहोत!” असे धमकावत किशोर निकमने गावठी कट्टा रितिकवर रोखला. जीवाच्या आकांताने रितिक गांधीधाम इमारतीच्या दिशेने पळू लागला.

त्याचवेळी त्याला जिवे मारण्याच्या उद्देशाने किशोर निकमने पाठीमागून थेट गोळी झाडली. सुदैवाने रितिकने हुलकावणी दिल्यामुळे गोळी चुकली. रितिक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचला आणि त्याने धाडस दाखवून मोबाईलवर खाली उभ्या असलेल्या या गुंडांचे थेट व्हिडिओ शूटिंग सुरू केले. आपण कॅमेऱ्यात कैद होत असल्याचे पाहताच संशयित सैरभैर झाले; त्यांनी रितिकच्या दिशेने दगडफेक केली. मात्र, पुरावा गोळा झाल्याच्या भीतीने आणि परिसरात नागरिक (Citizen) जमा झाल्याचे पाहून, “आज हा वाचला, पण जो मस्ती करेल त्याचा गेम वाजवू!” अशी धमकी देत तिघेही दुचाकीवरून पळून गेले.  

तांत्रिक पुराव्यांनुसार तिघे गजाआड

​या घटनेमुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली होती. अखेर उपनगर पोलिसांनी रितिकच्या तक्रारीवरून राहुल निकम, किशोर निकम आणि त्यांच्या साथीदारावर भारतीय न्याय संहिता कलम १०९(१) (जिवे मारण्याचा प्रयत्न), ३५२, ३५१(२), १२५ आणि शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक संजीव फुलपगारे करत असून, संशयितांचा व्हिडिओ हा या गुन्ह्यातील मोठा तांत्रिक पुरावा ठरणार आहे. 

ताज्या बातम्या

आयर्लंड अन् इंग्लंड दौऱ्यासाठी BCCI कडून भारतीय संघाची घोषणा! अय्यर कर्णधार,...

0
मुंबई । Mumbai भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी आयर्लंड, इंग्लंड दौरा आणि जपानमधील आशियाई खेळांसाठी अचानक टी-२० संघाची घोषणा करत क्रिकेट विश्वाला मोठा धक्का...