Saturday, October 3, 2026
Homeक्राईमNashik Crime News : माजी महापौरांचे 'स्त्रीधन' फस्त! अशोक मुर्तडकांच्या कुटुंबाला दोनशे...

Nashik Crime News : माजी महापौरांचे ‘स्त्रीधन’ फस्त! अशोक मुर्तडकांच्या कुटुंबाला दोनशे तोळे सोन्याचा गंडा; सराफावर गुन्हा

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

घरगुती सोन्याचे दागिने दुप्पट करून देण्याच्या अमिषाला बळी पडल्यामुळे नाशिकचे माजी महापौर अशोक देवराम मुर्तडक (Ashok Murtadak) यांच्या कुटुंबाला तब्बल २०० तोळे सोन्याचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. या फसवणुकीची (Fraud) रक्कम अंदाजे सव्वा ते दीड कोटी रुपये असून, या प्रकरणात संशयित सराफ व्यावसायिक योगेश बाळकृष्ण दाभाडे याच्याविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

​माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी पंचवटी पोलिसांत (Panchvati Police) फिर्याद नाेंदविली आहे. संशयित दाभाडे हा सराफ व्यावसायिक असून, मुर्तडक यांच्याशी त्याची सुमारे दोन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. मुर्तडक यांच्या आई व मावशी यांनी मृत्यूपूर्वी घरातील महिलांना (Woman) स्त्रीधन वाटून दिले होते. यामध्ये मुर्तडक यांच्या पत्नीकडे १०० तोळे, मुलीकडे ५० तोळे आणि सुनेकडे ५० तोळे असे एकूण २०० तोळे सोने होते. हेच सोने दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून दाभाडे याने १ जानेवारी २०२५ पूर्वी घरातील महिलांकडून ताब्यात घेतले.

सोने (Gold) ताब्यात घेतल्यानंतर संशयित दाभाडे याने ६ महिने कोणतीही हालचाल केली नाही. मूळ सोने किंवा वाढीव सोने, काहीच मिळत नसल्याचे पाहून महिलांनी अखेर हा प्रकार अशोक मुर्तडक यांच्या कानावर घातला. त्यानंतर मुर्तडक यांनी दाभाडेला घरी बोलावून, “आम्हाला वाढीव सोने नको, आमचे मूळ सोने परत कर” अशी मागणी केली. मात्र, संशयिताने विविध कारणे देत टाळाटाळ केली. अखेर दीड वर्ष उलटूनही हक्काचे सोने परत न मिळाल्याने आणि फसवणूक (Fraud) झाल्याची खात्री पटल्याने मुर्तडक कुटुंबाने पोलिसांत धाव घेतली. 

तेव्हा मुर्तडकांवर गुन्हा

​चालू वर्षात म्हणजेच एप्रिल २०२६ मध्ये संशयित योगेश दाभाडे याने अशोक मुर्तडक यांच्याविरुद्ध पंचवटी पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यात, मुर्तडक यांनी वर्षभरापूर्वी ९० लाख रुपये हातउसनवार घेतल्याचे नमूद केले हाेते. काही रकमेची परतफेड केल्यानंतर उर्वरित पैशांसाठी मुर्तडक यांनी गेल्या सहा महिन्यांपासून सतत मानसिक त्रास दिला. या कथित छळाला कंटाळून दाभाडेने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यानंतर, मुर्तडकांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. पंचवटी पोलिस (Panchvati Police) सध्या या दोन्ही परस्परविरोधी प्रकरणांचा आणि कोट्यवधींच्या सोन्याच्या अपहाराचा सखोल तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वर मंदिरात ‘या’ तारखेपर्यंत VIP दर्शन बंद;...

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar सध्या पितृपक्ष चालू असल्याने या काळात राज्यासह देशभरातून भाविक मोठ्या संख्येने त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे पितृकर्म व धार्मिक विधींसाठी येतात. शनिवार-रविवार...