Saturday, October 24, 2026
Homeक्राईमNashik Crime News : एफडीएची मोठी कारवाई; २ हजार २३० किलो मसाले...

Nashik Crime News : एफडीएची मोठी कारवाई; २ हजार २३० किलो मसाले जप्त, ११.८६ लाखांचा साठा ताब्यात

नाशिक | Nashik

सण-उत्सव विशेष मोहीम २०२६ अंतर्गत अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) नाशिक विभागाने (Nashik Division) मोठी कारवाई केली आहे. द्वारका परिसरातील ‘मे. सोमेश्वर घरगुती मसाले’ या आस्थापनेवर छापा टाकून प्रशासनाने तब्बल २ हजार २३० किलो मसाल्यांचा साठा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या या मसाल्याची बाजारभावानुसार एकूण किंमत ११ लाख ८६ हजार २०० रुपये इतकी आहे.

- Advertisement -

नियमभंग आणि चुकीच्या लेबलिंगमुळे कारवाई

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) सहआयुक्त मंगेश माने आणि सहायक आयुक्त (अन्न) व्ही. पी. धवड यांच्या मार्गदर्शनाखाली २२ ऑक्टोबर रोजी ही धडक कारवाई करण्यात आली. द्वारका येथील तिगरानिया औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक ५६, सर्व्हे क्रमांक ४०२/४०२/१ येथे असलेल्या ‘मे. सोमेश्वर घरगुती मसाले’ या कारखान्याची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान विविध प्रकारच्या मसाल्यांच्या पॅकिंगवर लेबलिंगविषयक नियमांचे उल्लंघन झाल्याचे (मिसब्रँडिंग) उघड झाले. तसेच, अन्नपदार्थांचा दर्जा निर्धारित गुणवत्ता निकषांनुसार नसल्याचा संशय आल्याने प्रशासनाने तात्काळ संपूर्ण साठा ताब्यात घेतला.

कोणते साहित्य जप्त केले?

प्रशासनाने जप्त केलेल्या ११,८६,२०० रुपयांच्या मसाल्यांच्या साठ्यामध्ये हळद पावडर – ३३८ किलो (किंमत २,०२,८०० रुपये) कांदा-लसूण मसाला – ४८ किलो (किंमत १९,२०० रुपये) धणे पावडर – २८८ किलो (किंमत १,९५,२०० रुपये) सुपर मिक्स गरम मसाला – २१६ किलो (किंमत ७५,६०० रुपये) स्पेशल मिक्स काळा मसाला – ६६४ किलो (किंमत २,६६,४०० रुपये) काळा मसाला – ३३८ किलो (किंमत २,३६,६०० रुपये) आणि मिरची पावडर ३३८ किलो (किंमत २,७०,४०० रुपये) या पदार्थांचा समावेश आहे.

दरम्यान, सण-सुदीच्या काळात नागरिकांच्या (Citizen) आरोग्याशी खेळणाऱ्या अशा भेसळ करणाऱ्या किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर एफडीएकडून आगामी काळातही कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Accident News : नाशिक जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाचा जयपूरमध्ये अपघात;...

0
नाशिक | Nashik राजस्थानमधील जयपूर येथे नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) अजमेर सौंदाणे तालुका सटाणा (Satana) येथील भाविकांच्या वाहनाला पहाटे झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू...