Thursday, July 23, 2026
Homeक्राईमNashik Crime News : ५९ कोटींचे खोटे सोने दाखवून ३८ कोटींची फसवणूक;...

Nashik Crime News : ५९ कोटींचे खोटे सोने दाखवून ३८ कोटींची फसवणूक; एक अटकेत

बाफना ज्वेलर्सच्या चाैदा स्थावर मालमत्ता जप्त,

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शरणपूर रोडवरील (Sharanpur Road) ‘मे. बाफना ज्वेलर्स प्रा.लि.’ने टीजेएसबी सहकारी बँकेची तब्बल ३८ कोटी रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याची घटना उघडकीस आली आहे. शाेरुममध्ये तब्बल ५९ कोटी रुपयांचे सोने, चांदी व हिरे असल्याचा बनावट साठा अहवाल (स्टॉक स्टेटमेंट) सादर करून बँकेची दिशाभूल करण्यात आली. मात्र, बँकेने कायदेशीर बडगा उगारत शोरूमची झाडाझडती घेतली असता, ५९ कोटींच्या ऐवजी प्रत्यक्षात अवघ्या २५ लाख रुपयांची चांदी आढळून आल्याने संपूर्ण नाशिकच्या सराफा बाजारात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) गुन्हा दाखल झाला असून मुख्य संशयित संचालक निलेश सुभाष बाफना याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

- Advertisement -

टीजेएसबी बँकेचे (TCB Bank) मॅनेजर सुहास विजय दंडवते (वय ५६) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बाफना ज्वेलर्सने ऑक्टोबर १९९८ पासून बँकेकडून वेळोवेळी व्यावसायिक गरजांसाठी कॅश क्रेडिट कर्ज घेतले होते. सुरुवातीला विश्वास संपादन करून हे कर्ज तब्बल ४४ कोटी रुपयांपर्यंत वाढवून घेण्यात आले. मार्च २०२५ पासून बाफना यांनी कर्जाचे हप्ते आणि व्याज भरणे बंद केले. वारंवार नोटिसा देऊनही उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने बँकेने जून २०२५ मध्ये हे खाते ‘एनपीए’ घोषित केले. बँकेने तारण मालमत्तेची तपासणी करण्याचे ठरवले असता संचालकांनी आधी टाळाटाळ केली.

त्यानंतर ३० एप्रिल २०२६ रोजी संचालकांनी स्वतःच्या स्वाक्षरीने दुकानात ५९ कोटी ७ लाख २४ हजार ८४४ रुपयांचा कच्चे सोने, सुवर्ण दागिने, हिरे आणि चांदीचा साठा असल्याचे खोटे स्टेटमेंट बँकेला सादर केले. दरम्यान, निलेश याला न्यायालयाने पाच दिवसांची पाेलिस काेठडी (Police Custody) सुनावली आहे. या गुन्ह्यामुळे बड्या सराफ व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे. तपास आर्थिक गुन्हेशाखा करत आहे. 

कोर्ट कमिशनर समोर शटर तोडले

​बँकेने ‘सरफेसी’ कायद्यांतर्गत जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे दाद मागितली. यानंतर  काेर्ट कमिश्नर अॅड. अमोल वावीकर यांच्या उपस्थितीत ३ जून २०२६ रोजी पोलीस बंदोबस्तात सुयोजित संकुल येथील बाफना यांच्या शोरूमचे शटर तोडून प्रत्यक्ष ताबा घेण्यात आला. अधिकृत मूल्यांकनकारांमार्फत जेव्हा संपूर्ण शोरूममधील शोकेस व कपाटांची तपासणी केली, तेव्हा बँकेच्या पायाखालची जमीनच सरकली. दुकानात सोने किंवा हिऱ्यांचा एक कणही नव्हता. संपूर्ण शोरूममध्ये फक्त २५ लाख १९ हजार २५० रुपयांचे चांदीचे दागिने आणि वस्तू आढळून आल्या. ५९ कोटींचा खोटा साठा दाखवून तब्बल ३८ कोटी रुपयांचा (व्याज व मुद्दलासह) अपहार केल्याचे निष्पन्न झाले.  

​१४ मालमत्तांवर टाच; इतरांचा शाेध सुरु

​या फसवणुकीनंतर टीजेएसबी बँकेने नवीन कर्ज वितरण व वसुली नियमावली आणि सरफेसी कायद्यानुसार कडक पावले उचलत बाफना यांच्या एकूण १४ स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. सरकारवाडा पोलिसांनी फिर्यादीवरून संचालक निलेश सुभाष बाफना, सुभाष लखीचंद बाफना, नम्रता निलेश बाफना, प्रभावती सुभाष बाफना आणि जामीनदार कांतीलाल बाफना, सरला पारसमल बाफना यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या विविध कलमांन्वये (३१६(५), ३१८(४), ६१(२) इत्यादी) फौजदारी कट रचून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातील साठा ‘किती’ टक्क्यांवर; मुळा धरणही निम्मे भरण्याच्या मार्गावर

0
भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात मंगळवारनंतर बुधवारीही आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल...