Saturday, September 12, 2026
Homeक्राईमNashik Crime News : विभागीय आयुक्तांच्या नावाने बनावट वर्क ऑर्डर; कुंभमेळ्याच्या नावाखाली...

Nashik Crime News : विभागीय आयुक्तांच्या नावाने बनावट वर्क ऑर्डर; कुंभमेळ्याच्या नावाखाली करोडोंची फसवणूक

जळगाव | Jalgaon

नाशिकमध्ये (Nashik) होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कंत्राट मिळवून देण्याच्या आमिषाने राज्यभरातील अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक (Fraud) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

- Advertisement -

संशयितांनी ऑनलाइन माध्यमातून बनावट कागदपत्रे (Fake Document) तयार करून थेट विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या नावाने हुबेहूब वर्क ऑर्डर तयार केल्या. या बनावट पत्रांच्या आधारे कंत्राटदारांकडून मोठी रकम उकळण्यात आली आहे.या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन या फसवणुकीचा पर्दाफाश केला.

कुंभमेळ्याच्या कामांचे आमिष दाखवून हा मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, ज्या कंत्राटदारांची (Contractors) किंवा नागरिकांची अशा प्रकारे फसवणूक झाली आहे, त्यांनी तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहनही मंत्री महाजन यांनी केले आहे.

दरम्यान, या फसवणुकीला आतापर्यंत जामनेर (Jamner) येथील दोन व्यक्ती, धुळे आणि मुंबईसह राज्यातील इतर भागांतील नागरिक बळी पडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र फसवणूक झालेल्या व्यक्तींची संख्या यापेक्षा मोठी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

आगामी सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या धर्मध्वजारोहण नियोजनाची बैठक; माजी महापौर आणि आयुक्तांमध्ये शाब्दिक...

0
पंचवटी | प्रतिनिधी Panchavati आगामी सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या धर्म ध्वजारोहण आणि ग्राम परिक्रमेच्या पूर्वतयारीसाठी शनिवारी (दि.१२) श्री शुक्ल यजूर्वेदिय ब्राह्मण संस्थेत रामसेतू पुलाजवळ बैठक आयोजित करण्यात...