Thursday, July 23, 2026
Homeक्राईमNashik Crime News : तरुणींसह टोळक्याचा राडा; कौटुंबिक वादातून गंगापूरच्या बेरोजगारांची अंबडला...

Nashik Crime News : तरुणींसह टोळक्याचा राडा; कौटुंबिक वादातून गंगापूरच्या बेरोजगारांची अंबडला दगडफेक

नाशिक | Nashik

दोन कुटुंबांतील जुन्या कौटुंबिक वादाचा सूड उगवण्यासाठी एका टोळक्याने दोन तरुणींच्या मदतीने नातलगांच्या घरावर दगडफेक केल्याची घटना अंबड हद्दीतील इंदिरा गांधी वसाहत क्रमांक एक येथे शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. नशेत धुंद असलेल्या या टोळीमध्ये (Gang) स्वतः तरुणी आघाडीवर राहून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत दगडफेक करत होती. हा थरार स्थानिकांच्या सीसीटीव्हीत कैद झाला असून टोळक्याचा शोध सुरु झाला आहे.

- Advertisement -

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित टोळक्यासह दोन तरुणी आणि तिच्या नातलगांमध्ये आधीपासूनच बाद सुरू होते. याच वादाचा वचपा काढण्यासाठी शनिवारी रात्री या तरुणींसह तिचे साथीदार गंगापूर गावातील (Gangapur Gaon) नातलग व बेरोजगार मित्रांना गोळा करुन दुचाकीवरुन बसाहतीत शिरले. नशेत असलेल्या या टोळक्याने हातात दगड घेऊन घरांच्या खिडक्या आणि दारांवर फेकून मारले. तसेच रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या काही वाहनांचीही तोडफोड केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले.

तरुणी व तिचे साथीदार एकमेकांना चिथावणी देत स्वतः रस्त्यावर धावपळ करत शिवीगाळ करत होते आणि नातलगांच्या घरावर आणि गल्लीत बेधडक दगडफेक करताना सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. वसाहतीत दगडफेक करणाऱ्या टोळीतील ५ ते ६ जणांचे चेहरे सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत असून, ते सर्व गंगापूर गावचे बेरोजगार तरुण असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेबाबत अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर तरुणीसह सर्वच संशयित पसार झाले असून, त्यांच्या मागावर पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

महागड्या कारच्या काचा फोडल्या

इंदिरा गांधी वसाहतीतील या राड्याच्या काही वेळ आधीच, म्हणजेच शनिवारी सायंकाळी ८ ते ८.१५ च्या सुमारास अंबडमधीलच उचभ्रू अशा आदर्श सोसायटी परिसरात आणखी दुसऱ्या एका टोळीने दहशत निर्माण केली. हातात लोखंडी रॉड घेतलेल्या ३ ते ४ अज्ञातांनी रस्त्याकडेला पार्क केलेल्या दोन चारचाकी वाहनांच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. तोडफोडीमध्ये माजी खासदार समीर भुजबळ यांचे निकटवर्तीय अमर वझरे यांच्या ‘बीएमडब्ल्यू’ कारचेही नुकसान झाले आहे. या दोन्ही टोळ्यांनी एकाच रात्री अंबड परिसर वेठीस धरूयाने पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातील साठा ‘किती’ टक्क्यांवर; मुळा धरणही निम्मे भरण्याच्या मार्गावर

0
भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात मंगळवारनंतर बुधवारीही आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल...