येवला | प्रतिनिधी | Yeola
शहरातील बाजीरावनगर येथे वधु-वर सूचक केंद्र सुरू करून त्याच्या माध्यमातून पैसे घेवुन लग्न लावुन देत फसवणूक (Fraud) करणारी टोळी शहर पोलिसानी (Police) जेरबंद केली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सहा संशयितांना न्यायालयापुढे (Court) हजर केले असता न्यायालयाने बुधवारपर्यंत त्यांना (दि. १५) पोलीस कोठडी दिली आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : सुनियोजित ‘हनी ट्रॅप’; कॉर्पोरेट छळाचा ‘नाशिक पॅटर्न’ उघड
याबाबात अधिक माहिती अशी की, माउली वधु-वर सूचक केंद्रात बुलढाणा येथील एजंट सांडु यशवंत जाधव, त्यांची पत्नी अलका यांनी विवाहासाठी मुलगी दाखवली. मुलगी पसंती नंतर विवाहासाठी १ लाख ७० हजार रुपये व वकीलाला देण्यासाठी ५ हजार संबंधितांकडून घेतले. तसेच लग्न साहीत्य खरेदीसाठी ४ हजार रुपये खर्च करावयास लावुन बाजीरावनगर येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिरामध्ये ३० मार्च २०२६ रोजी लग्न लावून दिले. लग्नानंतर काही दिवसातच नवरीने माझे येथे कोणीच नाही, जिवाचे बरे वाईट करुन घेईल अशी धमकी देत एजंट जाधव यांच्या घरी निघून गेली व पुन्हा नांदण्यास येण्यास नकार दिला. यामुळे आपली फसवणूक झाल्याबाबत फिर्याद संबंधितांनी पोलिसात दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
हे देखील वाचा : Nashik Crime News : ‘टॅब’ वाचवताना अब्रू गेली ! अशोक खरात ‘पार्ट-२’ टाळण्यासाठी पत्रकाराने खेळली रिस्की खेळी
शहर पोलीस ठाणे (City Police Station) पथकाने वरिष्ट अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात गुप्त माहिती काढुन या प्रकरणी सांडु यशवंत जाधव (वय ५७, रा. मढ ता.जि. बुलढाणा), प्रविण गणपत दिवे (वय ३४, रा. सम्राटनगर, पंचवटी, नाशिक), अलका सांडु जाधव (वय ५०, रा. मढ ता. जि. बुलढाणा), शशिकला भारत शिंदे (वय ५०, रा. अश्वमेधनगर, आरटीओ ऑफिस, पंचवटी नाशिक), सरिता सुकदेव पवार (वय २५, रा. बाभुळगाव कारखाना, ता. वसमत जि. हिंगोली), कृष्णाबस्ती जैसवाल (वय ३४, रा.१५५४ हिंगाना रोड, राजगृह, नागपूर) या सहा संशयितांना अटक केली. गुन्हयाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, शैलेश शेलार करीत आहेत.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातच्या अड्ड्यातून ‘मळकट द्रव्य’ जप्त; न्यायालयीन कोठडी की पुन्हा कोठडी? आज ‘व्हीसी’द्वारे फैसला




