Tuesday, June 16, 2026
Homeक्राईमNashik Crime News : 'टॅब' वाचवताना अब्रू गेली ! अशोक खरात 'पार्ट-२'...

Nashik Crime News : ‘टॅब’ वाचवताना अब्रू गेली ! अशोक खरात ‘पार्ट-२’ टाळण्यासाठी पत्रकाराने खेळली रिस्की खेळी

नाशिक | प्रतिनिधी |Nashik

एखाद्या गुन्हेगारी चित्रपटात शोभेल असा थरार सध्या नाशिकच्या (Nashik) वर्तुळात चर्चेचा ठरतो आहे. स्वतःला समाजाचा आरसा म्हणवणारा एक पत्रकार, जेव्हा स्वतःच्याच अश्लिल कृत्यांच्या जाळ्यात अडकतो आणि ते लपवण्यासाठी थेट पोलिसांनाच ‘साधन’ म्हणून वापरतो, तेव्हा काय होते? याचा प्रत्यय रविंद्र एरंडे उर्फ सबनीसच्या प्रकरणातून आला आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी अशोक खरात (Ashok Kharat) यांची ‘फाईल’ ओपन झाली आणि त्याचे डझनभर न्यूड व्हिडिओ वाऱ्यासारखे व्हायरल झाले. या एका घटनेने पत्रकार एरंडेच्या पायाखालची वाळू सरकली. कारण, ज्याप्रमाणे खरातचे कारनामे कॅमेऱ्यात कैद झाले होते, अगदी तसेच ‘नग्न सत्य’ एरंडेच्या बाबतीतही एका टॅबमध्ये कैद होते. हा टॅब बकरे नावाच्या व्यक्तीच्या हाती लागला होता आणि तिथूनच सुरू झाला ब्लॅकमेलिंगचा खेळ. बकरे आणि त्याच्या टोळीने त्या व्हिडिओच्या (Video) जोरावर एरंडेकडे १२ लाखांची खंडणी मागितली होती.

हे देखील वाचा : Nashik Crime News : नाशिकच्या ‘निदा’ने रचले धर्मांतर कांड; न्यायालयात खुलासा, तीन नव्या पीडितांना धीर

व्हिडिओ व्हायरल झाले तर करिअर संपणार,एरंडेच्या बाबतीतही एका टॅबमध्ये कैद होते. हा टॅब बकरे नावाच्या व्यक्तीच्या हाती लागला होता आणि तिथूनच सुरू झाला ब्लॅकमेलिंगचा खेळ. बकरे आणि त्याच्या टोळीने त्या व्हिडिओच्या जोरावर एरंडेकडे १२ लाखांची खंडणी मागितली होती. व्हिडिओ व्हायरल झाले तर करिअर संपणार,धोका टळेल. याच उद्देशाने त्याने सातपूर पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदविली.

असा आहे ट्रिस्ट

जेव्हा पोलिसांनी (Police) पुराव्यासाठी तो टॅब सुरू केला, तेव्हा त्यांना त्यात अशोक खरात प्रकरणाची जणू ‘सेकंड कॉपी’ च पाहायला मिळाली. ज्या तक्रारदाराने (एरंडेने) ही तक्रार दिली होती, त्याचेच अत्यंत आक्षेपार्ह व्हिडिओ पाहून पोलिसही चक्रावून गेले. स्वतःचे पाप धुण्यासाठी पोलिसांची मदत घेणाऱ्या या ‘मास्टरमाइंड’ चा खरा चेहरा उघड झाला. एरंडेने आपली अब्रू चव्हाट्यावर येऊ नये म्हणून हा सर्व प्रपंच केला होता. त्यात तो तांत्रिकदृष्ट्या यशस्वीही झाला, कारण त्याचे व्हिडिओ बाहेर पसरले नाहीत. मात्र, कायद्याच्या दप्तरात आणि पोलिसांच्या नजरेत तो आता उघडा पडला आहे. दुसऱ्याच्या जाळ्यातून सुटण्यासाठी त्याने पोलिसांना वापरले खरे, पण नियतीने त्याला स्वतःच्याच विणलेल्या जाळ्यात कैद केले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : सुनियोजित ‘हनी ट्रॅप’; कॉर्पोरेट छळाचा ‘नाशिक पॅटर्न’ उघड

शिकारी बनला शिकार !

पोलीस उपायुक्त किशोर काळे आणि सातपूरचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश आहिरे यांच्या आदेशाने तपास पथकाने तातडीने सूत्रे हलवली आणि युनिट दोनच्या मदतीने ओझरमधून बकरेसह त्याच्या साथीदारांना बेड्या ठोकल्या. एरंडेचा प्लॅन यशस्वी झाला. त्याचा टॅब पोलिसांच्या हाती लागला होता, पेनड्राइव्ह जप्त झाले होते आणि त्याचे व्हिडिओ ‘मार्केट’मध्ये येण्यापासून वाचले होते. पण… खरा ट्रिस्ट पुढेच होता!

हे देखील वाचा : Nashik Crime News : सुनियोजित ‘हनी ट्रॅप’; कॉर्पोरेट छळाचा ‘नाशिक पॅटर्न’ उघड

ताज्या बातम्या

राज्यात २८ जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण दिन

0
मुंबई | वृत्तसंस्था राज्यातील बालकांना पोलिओसारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण मिळावे तसेच गोवर-रुबेला निर्मूलन आणि एचपीव्ही लसीकरण मोहिमेला गती मिळावी, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम...