Sunday, June 7, 2026
Homeक्राईमNashik Crime News : सराईत 'मोबाईल स्नॅचर' गजाआड; ​गंगापूर पोलिसांची कारवाई

Nashik Crime News : सराईत ‘मोबाईल स्नॅचर’ गजाआड; ​गंगापूर पोलिसांची कारवाई

सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांच्या हातातील मोबाईल धावत्या दुचाकीवरून हिसकावून नेणाऱ्या एका सराईत मोबाईल स्नॅचरसह त्याच्या साथीदाराला जेरबंद करण्यात गंगापूर पोलिसांच्या (Gangapur Police) गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून पोलिसांनी तब्बल २१ महागडे मोबाईल फोन आणि ५ चोरीच्या मोटारसायकली असा एकूण ६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे नाशिकसह ठाणे जिल्ह्यातील एकूण ७ गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.

- Advertisement -

​२ मे २०२६ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास वसंतराव पवार चौकाकडून दत्त चौकाकडे पायी जाणाऱ्या एका नागरिकाला ऋषीराज कन्स्ट्रक्शनसमोर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जोरदार झटका दिला. त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून हे चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शोध पथकाने तातडीने तपास चक्र फिरवली. ​गुन्हे शोध पथकाचे अंमलदार सुजीत जाधव यांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेजची पडताळणी केली. यात त्यांना रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार ज्ञानेश्वर उर्फ नन्या मोतीराम दिवे (रा. गोवर्धन) हा स्पष्टपणे दिसून आला. पोलिसांना माहिती मिळाली की, गुन्हा केल्यावर संशयित पेठ तालुक्यातील हातरुंडी येथे लपून बसले आहेत.

पोलिसांनी त्र्यंबकेश्वर, घोटी आणि इगतपुरी परिसरात (Igatpuri Area) विशेष शोधमोहीम राबवून प्रथम त्याचा साथीदार गोवर्धन उर्फ गौरव गोपाळ शेवरे (वय २०, रा. पेठ) याला ताब्यात घेतले. दरम्यान, मुख्य संशयित ‘नन्या दिवे’ हा पाटीलवस्ती येथील कॅनाल रोडवर मोटारसायकलवरून येणार असल्याची माहिती अंमलदार सुजित जाधव यांना मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने पाटील वस्ती परिसरात साध्या वेशात सापळा रचला आणि नन्या दिवे याला बेड्या ठोकल्या. सहायक पाेलिस निरीक्षक तुषार देवरे, अंमलदार गिरीष महाले, रविंद्र मोहिते आणि भागवत थवील यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

​७ गुन्ह्यांची कबुली, २० मोबाईलचा तपास 

​पोलिसी खाक्या दाखवताच संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली. संशयित नन्या दिवे याने केवळ मोबाईलच नाही, तर ठाणे जिल्हा, निफाड, सातपूर, अंबड आणि गोवर्धनगाव परिसरातून दुचाकी चोरल्याचेही मान्य केले. त्यांच्याकडून गंगापूर पोलिस ठाण्यात दाखल दाेन २ मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे उघड झाले आहे. तसेच अंबड, निफाड, सातपूर, नाशिक तालुका व गणेशपुरी (ठाणे ग्रामीण) पोलिस ठाण्यात ५ दुचाकी चोरीचे गुन्हे नाेंद आहेत. जप्त केलेल्या २१ मोबाईल व्यतिरिक्त, नाशिक शहरातून स्नॅचिंग झालेल्या इतर २० मोबाईल फोनबाबत पोलिस आता अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

​Nashik Crime News : चोरांच्या पाऊलखुणा हुडकणारा पोलिसांचा ‘गूगल’; एका वासावर...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik ​शहरात घरफोड्या आणि दुचाकी चोऱ्या करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कुख्यात 'शिकलगार' टोळीच्या एका अट्टल गुन्हेगाराला मुंबई नाका पोलिसांनी (Mumbai Naka...