Thursday, October 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Crime News : पगाराचे पैसे अन् मालमत्तेसाठी दबाव; नोकरदार विवाहितेची आत्महत्या,...

Nashik Crime News : पगाराचे पैसे अन् मालमत्तेसाठी दबाव; नोकरदार विवाहितेची आत्महत्या, पतीसह सासू-सासऱ्याला अटक

नाशिक | Nashik

नोकरीच्या पगाराचे पैसे सासू सासऱ्यांना देण्यासाठी कथित दबाव, चारित्र्यावर संशय आणि माहेरील मालमत्ता हस्तांतरित करण्यासाठी तगादा लावल्याच्या आरोपांनंतर विवाहितेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना सातपूर परिसरात (Satpur Area) घडली.

- Advertisement -

पतीसह सासू-सासऱ्यांना अटक

दीपाली अनिल पवार (रा. नाशिक) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी तिचे वडील सयाजी रामदास गायकवाड यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलिसांनी (Satpur Police) पती अनिल सोन्याबापू पवार, सासू सुशीला पवार आणि सासरे सोन्याबापू पवार यांना अटक केली आहे.

पतीकडून चारित्र्यावर संशय

दीपालीचा विवाह २१ जानेवारी २०१४ रोजी अनिल पवार यांच्याशी झाला होता. त्यांना एक मुलगा असून दिपाली नोकरी करीत होती. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, पगाराच्या पैशांवरून तिच्यावर कथित दबाव आणला जात होता. तसेच पतीकडून (Husbend) तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

फ्लॅट दिराच्या नावावर करण्यासाठी दिपालीवर दबाव

अहिल्यानगर (Ahilyanagar) येथील दिपालीच्या नावावरील फ्लॅट पतीच्या भावाच्या नावावर करण्यासाठीही तिच्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप फिर्यादीत आहे. या कथित छळामुळे ती मानसिक तणावाखाली होती, असे माहेरच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. ४ ऑक्टोबर रोजी दीपालीने विषारी औषध सेवन केले. प्रकृती गंभीर झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

पोलिसांकडून पुढील तपास सुरु

या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम १०८ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सुनील पवार, सुवर्णा पवार, रेखा किशोर धोत्रे व किशोर धोत्रे यांच्या भूमिकेचाही तपास सुरू असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

नरेंद्र

PM Narendra Modi On Nana Patekar Death: नाना पाटेकर गेले पण...

0
मुंबई | Mumbaiज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. वयाच्या ७५व्या वर्षी गोव्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नाना पाटेकर...