Thursday, April 2, 2026
Homeक्राईमNashik News: लोंढे टोळी पुन्हा अटकेत; मोक्काच्या गुन्ह्यात फेरचौकशी, डॉक्टरचा 'गेम' फसला

Nashik News: लोंढे टोळी पुन्हा अटकेत; मोक्काच्या गुन्ह्यात फेरचौकशी, डॉक्टरचा ‘गेम’ फसला

नाशिक | प्रतिनिधी
सातपूर येथील ‘ऑरा’ बारमधील गोळीबार प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. या गुन्ह्यात केवळ गोळीबारच नाही, तर पुरावे नष्ट करण्याचा आणि गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला, त्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी बारमालक डॉक्टरच्या अटकेनंतर, आता लोंढे पिता-पुत्रांना पुन्हा एकदा बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

पाच ऑक्टोबरच्या मध्यरात्री ‘ऑरा’ बारमध्ये झालेल्या गोळीबारात वरुण तिवारी हा तरुण गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर बारचा मालक डॉ. बिपीन पटेल आणि नीलेश जोशी यांनी रक्ताचे डाग पुसून तांत्रिक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. एका उच्चशिक्षित डॉक्टरने सराईत गुन्हेगारांना वाचवण्यासाठी केलेले हे कृत्य पोलीस तपासात उघड झाले. या दोघांच्या अटकेनंतर लोंढे टोळीला मिळणाऱ्या ‘पांढरपेशी’ रसदीचा मार्ग स्पष्ट झाला आहे.

- Advertisement -

झेब्रा पट्टे गायब, चौकातील सिग्नल दिसेना! नाशिककरांना ‘ई-चलन’चा विनाकारण भुर्दंड

या प्रकरणाचा तपास करत असताना अंबड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्यासह पथकाने ‘पीएल’ ग्रुपचा म्होरक्या व माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, भूषण लोंढे आणि दीपक लोंढे यांच्यासह राहुल गायकवाडला पुन्हा ताब्यात घेतले आहे. या टोळीवर आधीच ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई झालेली असताना, गोळीबारानंतर त्यांना कोणी आर्थिक रसद पुरवली? फरार काळात त्यांना कोणी आश्रय दिला? व्यवहार कसे चालत होते? यावर आता पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या सुचनेने पोलिसांनी सर्व तांत्रिक पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. लोंढे टोळीने गेल्या काही वर्षांत दहशत पसरवून कमावलेल्या काळ्या पैशाचा हिशोब पोलिसांच्या रडारवर आहे.

ताज्या बातम्या

Sangamner : विठाबाई भाऊ नारायणगावकर तमाशा कलावंतांवर हल्ला

0
संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वरूडी फाटा येथे तमाशा कलावंतांच्या वाहनाला एका वाहनचालकाने कट मारत, इतरांना बोलावून घेत कलावंतांना बेदम मारहाण...