Tuesday, September 8, 2026
Homeक्राईमNashik Crime News : नाशिक पोलिसांचा गल्लीबोळांतील भाईंवर 'स्ट्राइक'; टवाळखोरी ते गुन्हेगारीची...

Nashik Crime News : नाशिक पोलिसांचा गल्लीबोळांतील भाईंवर ‘स्ट्राइक’; टवाळखोरी ते गुन्हेगारीची साखळी तुटली

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील संघटित गुन्हेगारी आणि बड्या टोळ्यांना ‘मिशन बालेकिल्ला’द्वारे गजाआड केल्यानंतर, नाशिक पोलिसांनी (Nashik Police) आता आपला मोर्चा गल्लीबोळांतील टवाळखोरांकडे वळवला आहे. छोटे गुन्हेच पुढे जाऊन मोठ्या गुन्हेगारीचे रूप घेतात, हा मूळ पॅटर्न ओळखून पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी शहरातील भाईगिरीची मुळेच उपटून टाकण्यासाठी ‘मिशन ऑलआऊट’ चा धडाका लावला आहे. नाशिकरोड आणि सातपूरनंतर आता गंगापूर पोलिसांनी (Gangapur Police) ‘पश्चिम’ भागात मध्यरात्रीपर्यंत राबवलेल्या ‘कॉम्बिंग ऑपरेशन’मुळे शहरातील छचोर भाईंचे धाबे दणाणले आहेत.

- Advertisement -

पोलिसांच्या (Police) ‘बालेकिल्ला’ मोहिमेमुळे शहरातील मोठे सराईत गुन्हेगार एकतर जेलच्या गजाआड आहेत किंवा शहरपार झाले आहेत. मात्र, तरीही उपनगर, पंचवटी, सातपूर, म्हसरुळ, गंगापूर, नाशिकरोड, अंबड, भद्रकाली, एमआयडीसी, आडगाव भागातील चौकाचौकांत व टपऱ्यांवर तरुणाईमध्ये वाढणारी ‘कट्टा संस्कृती’ आणि महिलांची छेडछाड पोलिसांच्या रडारवर आली आहे. अनेकदा हेच किरकोळ टवाळखोर पुढे जाऊन मोठ्या गँगचे सदस्य बनतात. म्हणूनच, ही गुन्हेगारी सुरुवातीलाच उद्धस्त करण्याचा निर्णय नाशिक पोलिसांनी घेतला आहे. गेल्या काही दिवसांत पोलिसांनी सलग तीन मोठे दणके देऊन टवाळखोरांचे कंबरडे मोडले आहे.

कॉलेजरोड अन् टपऱ्यांवर ‘थर्ड आय’

गंगापूर पोलिस ठाण्याच्या (Gangapur Police Station) हद्दीतील संवेदनशील भाग आणि विशेषतः तरुणाईचा वावर असलेल्या कॉलेज रोड परिसरातील कट्ट्यांवर पोलिसांनी अचानक ‘सर्च मोहीम’ राबवली. परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या नियंत्रणाखाली रात्री उशिरापर्यंत उघड्यावर मद्यप्राशन करणारे, कट मारून गाड्या चालवणारे आणि टपऱ्यांवर गर्दी करणाऱ्या संशयितांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या या पवित्र्यामुळे रात्री-अपरात्री रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या महिला आणि सामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

अशी चालली पोलिसांची ‘त्रिशूळ’ मोहीम

१८ जून : वास्को हॉटेलसमोरील – थरारानंतर ७० हून अधिक टवाळखोरांना बेड्या – स्त्यावरील दादागिरीला चाप.
२० जून : सातपूर – ऑल आऊट ऑपरेशनमध्ये १०३ हुल्लडबाजांवर गुन्हे दाखल – औद्योगिक वसाहतीतील छेडछाडीला ब्रेक.
२१-२२ जून : गंगापूर (पश्चिम) – कॉलेज रोड, कट्टे आणि टपऱ्यांवर मध्यरात्रीपर्यंत छापे – विनाकारण फिरणाऱ्यांची घेतली ‘शाळा’.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : खून करण्यासाठी मिटिंग प्रकरण; शेखर निकमच्या ताब्याला...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik फुलेनगरातील सागर जाधव (Sagar Jadhav) याच्यावर झालेल्या गोळीबार व हत्येचा कट रचल्यामागील सूत्रधार मानला जाणारा अमरावती मध्यवर्ती कारागृहातील (Amravati Central...